राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढ होणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

By आनंद डेकाटे | Updated: February 27, 2025 22:08 IST2025-02-27T22:05:39+5:302025-02-27T22:08:05+5:30

Nagpur News: विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरूवारी येथे केली.

raajayasataraiya-vaijanaana-saparadhaecayaa-bakasaisaata-vaadha-haonaara-saalaeya-saikasana-raajayamantarai-pankaja-bhaoyara-yaancai-ghaosanaa | राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढ होणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढ होणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

- आनंद डेकाटे 
नागपूर - विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरूवारी येथे केली.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्व संध्येला धरमपेठ येथील प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.  प्रो.राजेंद्रसिंह सायंस एक्सप्लोरेट्रीमच्या संचालक डॉ. सीमा उबाळे, उल्हास औरंगाबादकर, हेमंत चाफले यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री भोयर म्हणाले, विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५ हजार रुपयांवरून ५१ हजार रुपये करण्याचा निर्णय विभागाच्या विचाराधीन असून लवकरच तो जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याच्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. सीमा उबाळे यांनी संचालन केले तर हेमंत चाफले यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचा सत्कार 
राज्यमंत्री भोयर यांनी या ठिकाणी आयोजित विज्ञान प्रदर्शनीतील मांडण्यात आलेल्या विविध प्रयोगांचे निरीक्षण केले. मुंबई येथील डॉ. होमीभाभा विज्ञान केंद्राच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत सरस कामगिरी करणाऱ्या आफिया आफताब, कीर्ती येणुरकर आणि आदित्य रंजन या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री भोयर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: raajayasataraiya-vaijanaana-saparadhaecayaa-bakasaisaata-vaadha-haonaara-saalaeya-saikasana-raajayamantarai-pankaja-bhaoyara-yaancai-ghaosanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.