आयुर्वेद विद्यार्थ्यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:47 AM2017-09-30T01:47:01+5:302017-09-30T01:47:12+5:30

परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी न करणाºया अधिष्ठात्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राडा केला.

Rada of Ayurveda students | आयुर्वेद विद्यार्थ्यांचा राडा

आयुर्वेद विद्यार्थ्यांचा राडा

Next
ठळक मुद्देशासकीय आयुर्वेद महाविद्यालय : धक्काबुक्कीत पोलीस व विद्यार्थी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी न करणाºया अधिष्ठात्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राडा केला. विद्यार्थी पोलिसांनाही जुमानत नव्हते. यात झालेल्या धक्काबुक्कीत दोन पोलीस अधिकाºयासह दोन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेला घेऊन महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, या महाविद्यालयातील वसतिगृहाच्याा समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने पदवीच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी काराभाराच्या विरोधात ५ सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते. आता थेट पोलिसांपर्यंत हे नवे प्रकरण पोहचल्याने महाविद्यालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या तासिकेत ७५ टक्के तर प्रात्यक्षिकमध्ये (रुग्णालय) ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु काही विद्यार्थ्यांची उपस्थिती पाच ते ६० टक्केच आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून अनेकदा विद्यार्थ्यांना ताकीद, सूचना व समजही देण्यात आली. मात्र, तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी मनावर घेतले नाही. विद्यापीठातर्फे दर सहा महिन्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम (फायनल) वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातात. येत्या हिवाळी २०१७ परीक्षेला बसण्यासाठी काही विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमानुसार नव्हती. अर्ज भरण्याची गुरुवार २८ सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमानुसार नसल्यामुळे प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठाला पाठविलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला. प्रथम वर्षाचे जवळपास १८० विद्यार्थी सकाळी १० वाजेपासून प्रवेश शुल्क घेऊन अर्ज भरण्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, अधिष्ठाता विद्यार्थ्यांच्या अर्जांवर स्वाक्षरी करीत नव्हते. आता परीक्षेला मुकणार असे लक्षात येताच दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांनी राडा करायला सुरुवात केली. अधिष्ठात्यांविरोधात जोरजोरात नारे-निदर्शने केली. विद्यार्थ्यांना थांबविण्यासाठी अधिष्ठात्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता संतापलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावून पोलिसांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. तरीही पोलीस आत आल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. या झटापटीत सहायक पोलीस आयुक्त रवींद्र कापगते,पोलीस निरीक्षक सांदिपान पवार यांना किरकोळ दुखापतही झाली. तसेच प्रदीप अंभोरे व सृष्टी मेश्राम हे दोन विद्यार्थीही किरकोळ जखमी झाले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे तीनही प्रवेशद्वार बंद करून बाहेरच्यांना आतमध्ये येऊच दिले नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते.
पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा
सूत्रानुसार, आयुर्वेदिक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घेऊन आ. सुधाकर कोहळे यांनी याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या आंदोलनाला घेऊन पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव संजय देशमुख व आयुष संचालक डॉ. कुलदीप कोहली यांच्यामध्ये शासनस्तरावर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी करणार नाही
विद्यार्थी प्रॅक्टीकल व थेअरी करीत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती ५ ते १५ टक्के आहे. विद्यार्थी एक्स्ट्रा क्लासेसलासुद्धा येत नाहीत. उपस्थित राहून प्रॅक्टीकल व थेअरीच करणार नाही तर ते कौशल्यपूर्ण डॉक्टर कसे होतील? विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. यामुळे परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी करणार नाही.
- डॉ. गणेश मुक्कावार
अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

Web Title: Rada of Ayurveda students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.