नागपूर कारागृहात दोन टोळ्यांतील कैद्यांमध्ये ‘राडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 09:35 PM2022-11-30T21:35:19+5:302022-11-30T21:35:49+5:30

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन टोळ्यांच्या कैद्यांमध्ये हाणामारीसह जोरदार राडा झाला. मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड इप्पा व उत्तर नागपुरातील रजत पाली यांच्या टोळ्यांमध्ये ही हाणामारी झाली.

'Rada' between inmates from two gangs in prison | नागपूर कारागृहात दोन टोळ्यांतील कैद्यांमध्ये ‘राडा’

नागपूर कारागृहात दोन टोळ्यांतील कैद्यांमध्ये ‘राडा’

Next
ठळक मुद्देन्यायालयातून परत आल्यावर वेटिंग रूमजवळ घटना

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन टोळ्यांच्या कैद्यांमध्ये हाणामारीसह जोरदार राडा झाला. मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड इप्पा व उत्तर नागपुरातील रजत पाली यांच्या टोळ्यांमध्ये ही हाणामारी झाली. न्यायालयात हजेरीसाठी गेले असताना, दोन्ही टोळ्यांतील सदस्यांमध्ये वाद झाला होता व त्यानंतर कारागृहात परतल्यावर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.

इप्पासह काही सहकाऱ्यांची जामिनावर सुटका झाली असली, तरी त्याचे काही साथीदार कारागृहात आहेत, तर पाली हाही कारागृहातच आहे. बुधवारी सकाळी दोन्ही टोळ्यांच्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. पोलिस बंदोबस्त असल्याने तेथे सर्व शांत झाले. दुपारी कारागृहात परतल्यावर प्रतीक्षालयात कैदी बसले होते. यावेळी परत वाद झाला व काही क्षणांतच हाणामारीला सुरुवात झाली. गोंधळ होताच, सुरक्षारक्षकांनी धाव घेतली व त्यांना एकमेकांपासून दूर केले. यात एक कैदी जखमी झाला. धंतोली पोलिस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी संबंधित कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नागपूर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रकार वारंवार घडत आहे. दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची बाब बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती होती. असे असताना, त्यांना सोबत प्रतीक्षालयात का बसविण्यात आले व त्यावेळी तेथे सुरक्षारक्षक का उपस्थित नव्हते, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: 'Rada' between inmates from two gangs in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग