‘आॅनलाईन लॉटरी’ पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:45 AM2017-11-08T01:45:07+5:302017-11-08T01:46:25+5:30
नागपूर गा्रमीण पोलिसांच्या विशेष पथकाने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे सुरू असलेल्या ‘आॅनलाईन लॉटरी’वर धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : नागपूर गा्रमीण पोलिसांच्या विशेष पथकाने खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे सुरू असलेल्या ‘आॅनलाईन लॉटरी’वर धाड टाकली. त्यात हा अड्डा चालविणाºया दोघांना पोलिसांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि ‘आॅनलाईन लॉटरी’साठी वापरण्यात येणारे विविध साहित्य असा एकूण २८ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘आॅनलाईन लॉटरी’वर धाड टाकण्याची खापरखेडा परिसरातील ही पहिलीच कारवाई होय.
संजीव सत्यनारायण सिंग (३२, रा. वलनी माईन्स, ता. सावनेर) व प्रमोद बाळकृष्ण आमदरे (३७, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नागपूर शहरासोबतच नागपूर-भोपाळ महामार्गावरील कोराडी, महादुला, दहेगाव (रंगारी) या गावांचेही झपाट्याने नागरीकरण होत आहे. खापरखेडा परिसरात आधीच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असताना, त्यात नवनवीन अवैध धंद्यांची भर पडत आहे. दरम्यान, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे हे त्यांच्या पथकासह खापरखेडा परिसरात गस्तीवर असताना त्यांना दहेगाव (रंगारी) येथे ‘आॅनलाईन लॉटरी’ सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
परिणामी, पोलिसांनी या ठिकाणची बारकाईने पाहणी केली. तेव्हा तिथे काही तरुण ‘आॅनलाईन’ सट्ट्यावर पैसे लावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी लगेच धाड टाकली आणि ‘आॅनलाईन लॉटरी’ चालविणाºया संजीव सिंग व प्रमोद आमदरे या दोघांना ताब्यात घेत संपूर्ण खोलीची झडती घेतली.
त्यात पोलिसांना ‘आॅनलाईन लॉटरी’साठी वापरण्यात येणारे काही महत्त्वाचे साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून ३,५०० रुपये रोख, कॉम्प्युटरचे सहा मॉनिटर, सहा माऊस, वायफाय डिव्हाईस आणि मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या या साहित्याची एकूण किंमत २८ हजार ५३५ रुपये आहे.