मास्क न घालणाऱ्यांना ‘राेका आणि टाेका’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:39+5:302021-03-28T04:07:39+5:30
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या लोकांना थांबवून त्यांना मास्क घालायला बाध्य करणे व नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंगच्या ...
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या लोकांना थांबवून त्यांना मास्क घालायला बाध्य करणे व नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून घेणे यासाठी जागरूक तरुणांनी शहरात ‘राेका आणि टाेका’ अभियान सुरू केले आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे नागरिकांकडून पालन करवून घेणे, या उद्देशाने नागपूर सिटिझन फाेरमचे हे तरुण रस्त्यावर उतरून हे अभियान राबवित आहेत.
दाेन दिवसांपासून सीताबर्डी बाजारातून अभियानाला सुरुवात करण्यात आली. सीताबर्डी परिसरातील मुंजे चौक, मोदी गल्ली, इलेक्ट्राॅनिक्स मार्केट व बर्डी मेन रोड परिसरात हे अभियान राबविले. ‘मास्क वापरा व सोशल डिस्टंसिंगचे पालन करा’ या आशयाचे लक्षवेधी फलक फोरमच्या सदस्यांनी हाती धरले होते. गर्दी असणाऱ्या दुकानांपुढे जाऊन दुकानदार व ग्राहकांशी संवाद साधत त्यांना कोरोना नियमावलीबद्दल माहिती देण्यात आली. जे लोक मास्क घालत नाहीत, अशा लोकांना थांबवून त्यांना मास्क वाटप करून ते घालण्यासाठी बाध्य करण्यात आले. शुक्रवारी सीताबर्डी भागात जनजागृती केल्यानंतर शनिवारी धरमपेठ परिसरात असेच अभियान चालविले गेले. या अभियानात वैभव शिंदे पाटील, प्रतीक बैरागी, गजेंद्रसिंह लोहिया, अभिजित झा, अमित बांदूरकर, अभिजितसिंह चंदेल, नेहा डागोरिया, कुणाल थोरात, ललित थोरात, गोपाल सिंह, संकेत महल्ले, नवीन कामथे आदी सदस्यांचा सहभाग आहे. येत्या काळात महाल, इतवारी, मस्कासाथ, सदर, धरमपेठ, गोकुळपेठ, सक्करदरा, मानेवाडा, गिट्टी खदान, झिंगाबाई टाकळी, वाडी व कामठी या परिसरात हे अभियान राबविले जाईल.