रफींच्या गीतात रंगलेला ‘यादे फिर रफी..’
By admin | Published: August 4, 2014 12:56 AM2014-08-04T00:56:20+5:302014-08-04T00:56:20+5:30
रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात कुठेही असो, प्रेक्षकांची गर्दी ठरलेलीच. त्यात जुन्याजाणत्या गायकांचे सादरीकरण म्हटल्यावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. डॉ. देशपांडे सभागृहात
राजू व्यास व योगेश शर्मा यांचे आयोजन : मो. मुनाफ यांची संकल्पना
नागपूर : रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात कुठेही असो, प्रेक्षकांची गर्दी ठरलेलीच. त्यात जुन्याजाणत्या गायकांचे सादरीकरण म्हटल्यावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. डॉ. देशपांडे सभागृहात आज याची प्रचिती आली. रसिकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, रफी साहेबांची गीते, वादकांची उत्कृष्ट साथ आणि गायकांचे तयारीचे सादरीकरण असा कार्यक्रम रंगला.
राजू व्यास आणि योगेश शर्मा यांनी ‘यादे फिर रफी...’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची संकल्पना गायक मो. मुनाफ यांची होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक न्यू मेट्रो सिटी लँड डेव्हलपर्स, महेश आॅप्टीकल्स, नवरतन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मंगलदीप बँड, एमको ट्रेडिंग कंपनी आणि श्रीलक्ष्मी आईसक्रीम पार्लर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अकिल अहमद, महेश गुप्ता, संजयसिंग दीक्षित, लहानुजी इंगळे, महेश चाकणकर, मनीष निखाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गीतांचा सिलसिला रंगतदार ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध सेक्सोफोन आणि बासरीवादक प्रकाश खंडाळे गुलाबी आँखे जो तेरी देखी... हे गीत सेक्सोफोनवर सादर करून माहोल केला. बऱ्याच दिवसांनी प्रकाश खंडारे यांना ऐकण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली. त्यानंतर रफींच्या एकापेक्षा सरस गीतांनी रसिकांचा ताबा घेतला. यात मो. मुनाफ, नीलु मुनाफ, मुमताज खान, श्रुती चौधरी, राजू व्यास, मृणाल लगदे, प्रसन्न जोशी, साजीद कुरेशी, याकूब फजल, वीरेंद्र कोरडे, जमील शेख या गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात ‘आया रे खिलौनेवाला ..., तेरे नैनो से मे दीप..., लखनउ की सरजमी.., अकेले है चले आओ..., दिवाने है दिवानो को..., ओ नन्हे से फरिश्ते.., सात अजुबे इस दुनिया मे..., नजर ना लग जाए.., दिल ने फिर याद किया...चल कही दूर निकल जाए...’ आदी एकूण ३० गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन महेश तिवारी यांनी केले. प्रत्येकच गीताला वन्समोअरची दाद मिळत असल्याने आयोजकांपुढेही पेच निर्माण झाला. त्यात फर्माईशींचीही बरसात होती. पण एकूणच कार्यक्रम रसिकांना आनंद देणारा ठरला. यात गायकांना विविध वाद्यांवर पवन मानवटकर, नागेश गेडाम, प्रकाश खंडारे, प्रकाश चव्हाण, नितीन, राजु ठाकूर, संजय बारापात्रे, राजेश धामणकर, प्रशांत नागमोते यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)