राहता दलित कुटुंबावरील हल्ला प्रकरण: ‘त्या’ आरोपींना अटक करा, छगन भुजबळांची मागणी
By मंगेश व्यवहारे | Published: December 8, 2023 12:17 PM2023-12-08T12:17:47+5:302023-12-08T12:21:06+5:30
Maharashtra Assembly Winter Session: अहमदनगर जिल्ह्यातील राहता परिसरातील पिंपरीनिर्मळ या गावातील दोन दलित कुटुंबांवर एका समाजातील ४००-५०० जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या घराची नासधुस केली. लहान मुलीनांही मारहाण केली होती.
- मंगेश व्यवहारे
नागपूर - अहमदनगर जिल्ह्यातील राहता परिसरातील पिंपरीनिर्मळ या गावातील दोन दलित कुटुंबांवर एका समाजातील ४००-५०० जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या घराची नासधुस केली. लहान मुलीनांही मारहाण केली. या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा ७१ जणांवर गुन्हा दाखल झाला. परंतु, एकाही आरोपीला अटक केलेली नाही. हे योग्य नाही. आरोपी कुणीही असो, कितीही मोठा असो आणि कुठल्याही समाजाचा असो; त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. निवडणुकीत दलित समाजाने त्यांच्याच समाजातील उमेदवाराला मतदान केले, त्यावरून हा हल्ला केला; असा प्रकार योग्य नसल्याची भूमिका भुजबळ यांनी मांडली.