राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:26 AM2017-10-10T00:26:06+5:302017-10-10T00:26:36+5:30

अखिल भारतीय काँगेस कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्यात यावी, असा ठराव नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी एकमताने पारित करण्यात आला.

Rahul Gandhi as the Congress president | राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करा

राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करा

Next
ठळक मुद्देशहर काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव : समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय काँगेस कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्यात यावी, असा ठराव नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी एकमताने पारित करण्यात आला.
शहर काँग्रेस कमिटीची बैठक देवडिया भवन येथे आयोजित करण्यात आली होती. तीत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. सूचक म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. अभिजित वंजारी तर उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे यांनी यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव पारित करण्यात आला. प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे हा ठराव पाठविला जाणार आहे. ठराव एकमताने पारित होताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या.
भाजपाच्या सत्ता काळात अमित शहा यांच्या सोबतच रामदेवबाबा यांचीही संपत्ती वाढली आहे. आसाराम, राम रहीम हे पंतप्रधानांचे हस्तक आहेत. नोटाबंदी व जीएसटी विरोधात भाजपाचे नेते अरुण शौरी, यशवंत सिन्हा बोलू लागले आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदी करून सर्वसामान्यांना वेठीस धरल्याची टीका विकास ठाकरे यांनी यावेळी केली.
महागाई, बेरोजगारी, काळाबाजार, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. या विरोधात शहरातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रात आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न क रणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी १० ते १२ हजार मते घेतली. त्यांनी प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या सोडवून भाजपाची पोलखोल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यक्रमासाठी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जयंत लुटे, अण्णाजी राऊ त, अ‍ॅड.अक्षय समर्थ, मालिनी खोब्रागडे, महेश श्रीवास, नरेश शिरमवार, दीपक वानखेडे, इर्शाद अली, सुनील दहीकर, अनिल पांडे, पंकज निघोट, अब्दुल शकील, रवी वानखेडे, मिलिंद सोनटक्के, किरण गडकरी, सदन यादव, विवेक निकोसे, वंदना रोटकर, स्नेहल दहीकर, किशोर गीद, निर्मला बोरकर, तौसिक अहमद, राजेश ढेगे, नंदकिशार गोहणे, रेखा यादव, आकाश तायवाडे, संदीप कातोडे, युगल विदावत, प्रमोद ठाकूर, अलोक मून, राजेश पौनीकर, धरमकुमार पाटील, अंबादास गोंडाणे, सूरज आवळे, प्रशांत पाटील, बॉबी दहीवाले, शंकर देवगडे, इर्शाद मलिक, अमित पाठक, चंदू वाकोडकर, सुनील गुलगुलवार, विजया ताजणे, वैभव काळे, आकाश तायवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.
अमित शहांचा पुतळा जाळला
भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचे पुत्र जय शहा यांची कंपनी तीन वर्षे तोट्यात होती. असे असतानाही कंपनीचा नफा गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढला आहे. मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून शहा यांनी जनतेची लूट केली. याचा निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठकीपूर्वी चिटणवीस पार्क चौकात अमित शहा यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा व शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले.

Web Title: Rahul Gandhi as the Congress president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.