नागपूरनजीकच्या कामठी येथील कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:57 PM2019-10-11T23:57:23+5:302019-10-11T23:58:24+5:30

नागपूर शहर पोलिसांच्या विशेष पथकाने कामठी शहरातील रमानगर भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली. त्यात कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका केली.

Raid at brothel in Kamthi near Nagpur | नागपूरनजीकच्या कामठी येथील कुंटणखान्यावर धाड

नागपूरनजीकच्या कामठी येथील कुंटणखान्यावर धाड

Next
ठळक मुद्देआरोपी महिलेस अटक : नागपूर शहर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : नागपूर शहर पोलिसांच्या विशेष पथकाने कामठी शहरातील रमानगर भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली. त्यात कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ४.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नागपूर शहर पोलिसांचे विशेष पथक कामठी शहरात गस्तीवर असताना त्यांना शहरातील रमानगरात कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्या कुंटणखान्याची खातरजमा केली. तिथे देहव्यापार चालविला जात असल्याचे निदर्शनास येताच बनावट ग्राहकाने सूचना केली आणि परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेच धाड टाकली.
यात पोलिसांनी देहव्यापारासाठी आणलेल्या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली तर हा कुंटणखाना चालविणाऱ्या ४९ वर्षीय महिलेस अटक केली. ती महिला तरुणी व इतर महिलांची आर्थिक निकड ओळखून त्यांना पैशाचे आमिष दाखवायची आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत पैसा कमवायची. शिवाय, ग्राहकांना जागाही उपलब्ध करून द्यायची, असेही पोालिसांनी सांगितले. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६, कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सूरज भारती, योगेश तातोडे, विनोद सोनटक्के, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत, चेतन जाधव, मृदूल नागरे, सुजाता पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid at brothel in Kamthi near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.