नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:11 AM2018-01-12T00:11:33+5:302018-01-12T00:14:50+5:30

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी लकडगंजमधील एका कुंटणखान्यावर छापा घालून सात महिलांना वेश्याव्यवसाय करताना ताब्यात घेतले.

The raid on brothel in Lakadganj area | नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा

नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा

Next
ठळक मुद्देसात वारांगनांसह पाच ग्राहकही सापडले : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी लकडगंजमधील एका कुंटणखान्यावर छापा घालून सात महिलांना वेश्याव्यवसाय करताना ताब्यात घेतले. आपल्याकडून हा गोरखधंदा आशा केसिया नामक महिला करवून घेत असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे पोलिसांनी त्यांची सुटका केली. तर, आशा केसिया तसेच कुंटणखान्यावर सापडलेल्या पाच ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गंगाजमुना परिसरात आशा केसिया अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालवित होती. मध्यंतरी पोलिसांनी छापासत्र सुरू केल्याने तिने तेथून पळ काढला होता. गेल्या काही दिवसांपासून आशाने परत तेथे कुंटणखाना सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक अमिता जयपूरकर, संजीवनी थोरात, एएसआय पांडुरंग निकुरे, अजय जाधव, विजय गायकवाड, दामोदर राजुरकर, संगीता तिडके, छाया राऊत, साधना चव्हाण अनिल दुबे, भीमराव मेश्राम, गणेश बांबडेकर तसेच प्रेमलता भालेराव आणि राणी कळमकर यांनी आशाच्या कुंटणखान्यावर गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास छापा घातला. यावेळी आशा पळून गेली. तर, महिलांसोबत नको त्या अवस्थेत ग्राहक आढळले. त्यात मध्य प्रदेशातील लखनादोहचा पवनकुमार ऊर्फ हालकू छबीलाल अहिर (वय २२) तसेच नागपुरातील सुमित सुधाकर आत्राम, (वय २१), भूपेंद्र गंगाराम वर्मा (वय २१)आतिश दिलीप घोळके (वय २५) आणि दीपक संतोष जयस्वाल (वय १९) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वारांगनांची सुटका, ग्राहकांवर गुन्हा
देहविक्रय करणाऱ्या    महिलांची पोलिसांनी सुटका केली. मात्र, त्यांना पैश्याचे प्रलोभन देऊन ग्राहकांसमोर हजर करणाऱ्या    आशा केसिया आणि पकडलेल्या आरोपींविरुद्ध लकडगंज ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३७०, ३४ तसेच सहकलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल केला.

 

 

Web Title: The raid on brothel in Lakadganj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.