नागपूरच्या सदर येथील बुलक कार्ट बारवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:08 AM2020-07-26T00:08:42+5:302020-07-26T00:13:35+5:30

माऊंट रोड सदर येथील बुलक कार्ट या बीअर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अधिक किमतीवर दारू विक्री सुरू होत असल्याने धाड टाकण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी चार आारोपींना अटक केली.

Raid on Bullock Cart Bar at Sadar, Nagpur | नागपूरच्या सदर येथील बुलक कार्ट बारवर धाड

नागपूरच्या सदर येथील बुलक कार्ट बारवर धाड

googlenewsNext
ठळक मुद्दे रात्री उशिरापर्यंत सुरू होती दारू विक्रीगुन्हे शाखा व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माऊंट रोड सदर येथील बुलक कार्ट या बीअर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अधिक किमतीवर दारू विक्री सुरू होत असल्याने धाड टाकण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी चार आारोपींना अटक केली. गुरुप्रीतसिंग सोहनसिंग, कमलेश केशवप्रसाद तिवारी, कवलजितसिंग सोहनसिंग आणि मोहिंदरपालसिंग सोहनसिंग अशी त्यांची नावे आहेत. सिंग यांचे सदरमध्ये बुलक कार्ट बीअर बार अँड रेस्टॉरंट आहे. जेवणाचे पार्सल देण्याच्या नावाखाली सिंग बंधू देशी-विदेशी मद्याची उशिरा रात्रीपर्यंत विक्री करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास बीअर बारमध्ये पंटरला पाठवले. पंटरने ब्लेंडर प्राईड आणि किंगफिशर बीअर तेथून एक हजार पाचशे रुपयात विकत घेतली. त्याच वेळी पोलिसांनी आरोपी बारमालक गुरुप्रीतसिंग, मोहिंदर सिंग आणि कवलजितसिंग या तिघांसह कमलेश तिवारी या चौघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पीआय चौधरी यांच्या नेतृत्वात एपीआय पंकज धाडगे, हवालदार प्रशांत लाडे, रामचंद्र कारेमोरे, शैलेश पाटील, श्याम कडू, प्रवीण गोरटे, अमित पात्रे, संदीप मावलकर, शेख फिरोज, राजू पोतदार यांनी केली.

७ वाजेनंतरही सर्रास विक्री
पोलीस अधिकाऱ्यानुसार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सध्या वाईन शॉप यांना सायंकाळी ५ आणि बार यांना सायंकाळी ७ वाजेपर्यंतच पार्सल देण्याची परवानगी आहे. परंतु हे बार संचालक भोजन आणि पार्सलच्या नावावर रात्री उशिरापर्यंत प्रति बॉटल १५० रुपये अधिकचे घेऊन दारू विक्री करीत होते.
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही
शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत आपली कारवाई सुरू ठेवली. अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले की, कारवाई सुरू आहे. परंतु उत्पादन शुल्क विभागाने नेमकी काय कारवाई केली, हे मात्र स्पष्ट केले नाही.

Web Title: Raid on Bullock Cart Bar at Sadar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.