नागपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा  , तीन बुकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:47 PM2020-11-07T23:47:52+5:302020-11-07T23:49:02+5:30

Raid on cricket betting den , crime news गुन्हे शाखेच्या पथकाने लकडगंजमधील एका आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घालून तीन बुकी पकडले. शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

Raid on cricket betting den in Nagpur, three bookies go missing | नागपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा  , तीन बुकी गजाआड

नागपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा  , तीन बुकी गजाआड

Next
ठळक मुद्देलकडगंजमधील सूत्रधार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने लकडगंजमधील एका आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घालून तीन बुकी पकडले. शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

लकडगंजच्या क्वेट्टा कॉलनीत मजिद शेख याच्या घरी क्रिकेट सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चौधरी आणि सहकाऱ्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी तेथे छापा घातला असता आरोपी सतीश मोहनलाल देवांगण (वय ३३, रा. सतरंजीपुरा), गणेश दयाराम शाहू (वय ३५, रा. डिप्टी सिग्नल, शितला माता मंदिरजवळ कळमना) आणि उमेश शेखर शाहू (वय २१, रा. डिप्टी सिग्नल, कबीर समाज भवन मागे) हे तिघे सनराईज हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंज बंगरुळू यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून कटिंग करवून घेणारा मुख्य बुकी मात्र या कारवाईनंतर फरार झाला.

अरोराकडे होत होती कटिंग

अटकेतील तिघांच्या चौकशीतून ते लकडगंजमधील बुकी यश याच्याकडे कटिंग (सट्ट्याची उतारी) करीत असल्याचे उघड झाले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक पंकज धाडगे, पवन मोरे, हवलदार प्रशांत लाडे, दशरथ मिश्रा, शाम कडू, शाम अंगुलथलेवार, प्रवीण गोरटे, संदीप मावळकर आणि फिरोज खान यांनी ही कामगिरी बजावली.

याच पथकाने शनिवारी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोईपुरा नातू मंदिराजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा घालून रजनी रामचंद्र कटारे (वय ५५), जयचंद प्रेमलाल गौर (वय ६०), राजेश मदनलाल गौर (वय ५२) आणि मोहन रामचंद्र कटारे (वय २४) या चौघांना पकडले. त्यांच्याकडून मटक्याच्या साहित्यासह १ लाख ३९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Raid on cricket betting den in Nagpur, three bookies go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.