कळमन्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:45 AM2018-05-15T00:45:12+5:302018-05-15T00:45:28+5:30

कळमन्यातील पारडी भागात चालणाऱ्या एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून कळमना पोलिसांनी तीन बुकी पकडले. संतोष गोनुराम मलघाटी (वय२८), मंगेश गणपत निंबुळकर (वय ३४, रा. कडबी चौक) आणि सुनील मुन्नीलाल कछवारे (वय २८, रा. समतानगर), अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि १० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Raid at Cricket betting in Kalamna | कळमन्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

कळमन्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

Next
ठळक मुद्दे१० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल जप्त : तीन बुकी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील पारडी भागात चालणाऱ्या एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून कळमना पोलिसांनी तीन बुकी पकडले. संतोष गोनुराम मलघाटी (वय२८), मंगेश गणपत निंबुळकर (वय ३४, रा. कडबी चौक) आणि सुनील मुन्नीलाल कछवारे (वय २८, रा. समतानगर), अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि १० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पुनापूर रोड, श्यामनगरमध्ये क्रिकेट सट्टा अड्डा सुरू आहे, अशी माहिती कळमना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी रविवारी रात्री तेथे छापा घातला. यावेळी तेथे संतोष मलघाटी, मंगेश गणपत निंबुळकर आणि सुनील कछवारे हे तीन बुकी क्रिकेट सामन्यावर खायवाडी-लगवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १० मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि रोख ३,२५० रुपयांसह ७६,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा क्रिकेटचा अड्डा सुरू होता. शहरातील एक बडा बुकी या तिघांना संचलित करीत होता. तो बुकी हवालात गुंतला असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
परिमंडळ ५ चे प्रभारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कळमन्याचे ठाणेदार खुशाल तिजारे, पीएसआय नीलेश गोसावी, नायक जयंता शंभरकर, पंकज लांडे, दिनेश लांजेवार, प्रफुल्ल ढवळे, पवन पिट्टलवार आणि महिला पोलीस शिपाई भावना यांनी ही कारवाई केली.

Web Title: Raid at Cricket betting in Kalamna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.