साटक शिवारातील दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:49+5:302021-04-23T04:09:49+5:30
रामटेक : पाेलिसांनी साटक शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून दारू काढणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६१ हजार ४५० ...
रामटेक : पाेलिसांनी साटक शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून दारू काढणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) करण्यात आली.
रामा देवचंद कुंभलकर (३१, रा. साटक, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. रामटेक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना साटक शिवारात माेहफुलाची दारूभट्टी सुरू असून, तिथे दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या शिवाराची पाहणी केली. तेथील एका झुडपात दारूभट्टी आढळून येताच पाेलिसांनी रामा कुंभलकर यास ताब्यात घेत अटक केली. या धावपळीत त्याचे दाेन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या कारवाईत आराेपीकडून माेहफुलाचा ६०० लिटर सडवा (दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) ४५० लिटर माेहफुलाची दारू, प्लॅस्टिकचे तीन ड्रम व दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ६१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. पसार आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगून अवैध दारूविक्री आणि माेहफुलाच्या दारूभट्ट्यांबाबत माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद राऊत, हवालदार नीलेश बिजवाड, नितेश पिपराेदे, याेगेश भुरे, प्रज्वल नंदेश्वर, शिवशंकर भाेयर यांच्या पथकाने केली.