नागपुरातील भिलगावमधील जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:16 PM2020-05-05T21:16:35+5:302020-05-05T21:21:26+5:30
भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक भिलगाव परिसरात गस्त करीत असताना त्यांना राजू किराणा स्टोअर्सला लागून असलेल्या एक बंद रूममध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक मोहिते, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, फौजदार प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक शिपाई नरेश मोडक, विजय लांजेवार आणि रत्नाकर कोठे आदींनी त्या रूममध्ये छापा घातला आणि जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. नऊ आरोपी तेथे ताशपत्त्याचा जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २५ हजार ३८५ रुपये, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल आणि पाच मोटरसायकल असा एकूण ३ लाख ३१ हजार ३८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे
राजेंद्र आनंदराव मेश्राम (भिलगाव), कुणाल एकनाथ भनारे (यशोधरानगर), विजेंद्र राघोजी रोकडे (गोकुळ नगरी, भिलगाव), पंकज ऊर्फ पप्पू घनश्याम फलके, शत्रुघ्न बाबुराव पारधी (खराळा, कपिलनगर) रवींद्र ऊर्फ रवी तेजराम कुमेरिया (अग्रसेननगर), रूपेश सदाशिव मानकर (भिलगाव), मनोहर गोविंदराव चौधरी आणि महेश नीळकंठ वंजारी (रा. भिलगाव).