नागपुरातील पाचपावलीतील जुगार अड्ड्यावर छापा : १७ जुगारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:55 AM2019-03-09T00:55:18+5:302019-03-09T00:56:04+5:30
पाचपावली पोलिसांनी नंदगिरी मार्गावरील पांडुरंग शिंदेकरच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांनी नंदगिरी मार्गावरील पांडुरंग शिंदेकरच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला.
विनोद पांडुरंग शिंदेकर (वय ४१, रा. नंदगिरी रोड, पाचपावली), नरेंद्र पांडुरंग शिंदेकर (वय ५०), पांडुरंग विठ्ठल शिंदेकर (वय ७५), दिनेश बालाजी राऊत (वय ५०, रा. शेषनगर, खरबी), फारूख इब्राहिम खत्री (वय ५६, रा. बंगाली पंजा), संतोष बंसीलाल निबरे (वय ५६, रा. लालगंज), विनोद मारूती चव्हाण (वय २८, रा. पाचपावली), पंकज रमेश कोचे (वय ४१, रा.भानखेडा), विनोद तुलसीराम गुप्ता (वय ३८, रा.कांजी हाऊस चौक), करण प्रकाश ठाकूर (वय ३३, रा. पंजाबी लाईन), अब्दुल कवी मोहम्मद बशिर (वय ३२, रा.भानखेडा), संजय नेणूमल साधवानी (वय ४०, रा. हत्ती बिल्डींग चौक), सतीश गजानन पौनीकर (वय ३५, रा. कळमना), संजय यादवराव माताघरे (वय ५५, रा. गोळीबार चौक), कादर खान छोटे साहेब खान (वय २९, रा. मारवाडी चौक), सागर रामदास गुलवानी (वय ३८, रा. दयानंद पार्कजवळ) आणि कमलेश मधुकर सोनकुसरे (वय ४०, रा. गुलशननगर) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून १९ हजार, एक टीव्ही, ८ मोबाईल, ६ दुचाकी आणि अन्य साहित्यासह ३ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जाधव, उपनिरीक्ष्रक पी. एन. खंडार, हवलदार रामेश्वर कोहळे, नायक राज चौधरी, अभय साखरे, शैलेश चौधरी, गजानन निशितकर आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.
पोलिसांची आहे साथ
अटक केलेल्यांमध्ये विनोद, नरेंद्र हे दोन सख्खे भाऊ आणि त्यांचे वडील पांडुरंग शिंदेकर अशा बापलेकांचा समावेश आहे. अनेक दिवसांपासून शिंदेकरकडे हा जुगार अड्डा सुरू होता. पाचपावलीत कार्यरत काही पोलिसांना या अड्ड्याची माहिती आणि साथ होती. मोठा हप्ता मिळत असल्यामुळे ते तेथे कारवाई करीत नव्हते. उलट कुणी कारवाई करणार असेल तर हे भ्रष्ट पोलीस शिंदेकरला सतर्क करीत होते. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.५५ वाजता तेथे छापा मारून जुगाºयांना रंगेहात पकडण्यात यश मिळवले.