आठवा मैल परिसरातील जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:56+5:302021-08-25T04:12:56+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : पाेलिसांच्या पथकाने आठवा मैल परिसरातील म्हाडा काॅलनी, गणेशनगर येथील जुगारावर धाड टाकत १० जुगाऱ्यांना ...

Raid on gambling in the eighth mile area | आठवा मैल परिसरातील जुगारावर धाड

आठवा मैल परिसरातील जुगारावर धाड

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : पाेलिसांच्या पथकाने आठवा मैल परिसरातील म्हाडा काॅलनी, गणेशनगर येथील जुगारावर धाड टाकत १० जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम, सात माेटरसायकली व माेबाईल फाेन असा एकूण ३ लाख ३ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. २२) करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये रवी गुरुदयाल बत्रा, रा. वेलकम सोसायटी, काटोल रोड, नागपूर, शिव अरुण झनझोटे, रा. सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स, नागपूर, मोहन ज्ञानेश्वर खरजे, रा. शिवाजीनगर, वडधामना, नीलेश प्रकाश धानके, रा. सीपीडब्ल्यूडी कॉलनी, गिट्टीखदान, नागपूर, अभिषेक ऊर्फ बादल किशोर शिंगारे, रा. सुखसागर सोसायटी, दाभा, नागपूर, विलास वनवास तोडासे, रा. जगदीशनगर, काटोल रोड, नागपूर, राज धनराज शेंडे, रा आठवा मैल, दवलामेटी, वैभव उत्तम ठाकरे, रा. आयबीएम रोड, गिट्टीखदान, नागपूर, सनी विजय मेश्राम, रा. विकासनगर, वाडी, हिरासिंग शंकरसिंग परिहार, रा. मकरधोकडा, काटोल रोड, नागपूर यांचा समावेश असून सतीश उईके, रा. मकरधोकडा, गिट्टीखदान, नागपूर असे पसार आराेपीचे नाव आहे.

म्हाडा काॅलनी, गणेशनगर येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने पाहणी करीत धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक करण्यात आली असून, एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार माेटरसायकली व तीन ॲक्टिव्हा, ५१ हजार रुपये किमतीचे माेबाईल फाेन, १२,३६० रुपये राेख व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ३ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Raid on gambling in the eighth mile area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.