कांद्री येथील जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:44+5:302021-05-12T04:09:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पाेलिसांच्या पथकाने कांद्री (ता. पारशिवनी) येथील हरीहर नगरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांच्या पथकाने कांद्री (ता. पारशिवनी) येथील हरीहर नगरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेत अटक केली आणि त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ७५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपी जुगाऱ्यांमध्ये सचिन नत्थूजी पटले (२५), प्रकाश रवी सिंग (२४), शुभम पृथ्वीराज मेश्राम (२३), सुनील कृष्णा बोबडे (३५) सर्व रा. कांद्री, ता. पारशिवनी, अक्षय गुणवंत कुंभलकर (२१), राधेश्याम मधुकर सातपैसे (३८) दाेघेही रा. टेकाडी, ता. पारशिवनी, शंकर हरी उइके (३७), अल्ताफ हाफिज शेख (२६) दाेघेही रा. पारशिवनी, रवी गजभिये (२२, रा. खाण क्रमांक-६, कन्हान, ता. पारशिवनी) व सुमित दीपक दिवे (२९, रा. कन्हान, ता. पारशिवनी) यांचा समावेश आहे.
कांद्री येथील हरीहर नगरात जुगार खेळला जात असल्याची माहिती कन्हान पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या भागाची पाहणी केली. तिथे जुगार सुरू असल्याचे लक्षात येताच पाेलिसांनी लगेच धाड टाकली. यात त्यांनी जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून ३५ हजार ३६० रुपये राेख, ४० हजार रुपये किमतीचे चार माेबाईल हॅण्डसेट, तीन लाख रुपये किमतीच्या तीन माेटरसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ७५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई परिविक्षाधीन पाेलीस उपअधीक्षक सुजितकुमार शिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, येशु जोसेफ, शरद गीते, कुणाल पारधी, राहुल रंगारी, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, सुधीर चव्हाण यांच्या पथकाने केली.