नांदा शिवारातील जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:06+5:302021-06-04T04:08:06+5:30
खापरखेडा : पाेलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान नांदा (ता. कामठी) शिवारातील जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक करण्यात ...
खापरखेडा : पाेलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान नांदा (ता. कामठी) शिवारातील जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९,५०० रुपये राेख, माेबाईल हॅण्डसेट, माेटारसायकली असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. १) करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये मॅथ्यू राजेंद्र स्वामी (४४), सुनील दत्ता वाढाेळे (४०), महेश जनबाेधकर, साेनू चंदनलाल राऊत (२३), सिद्धार्थ भाेजराज गजभिये (३१) सर्व रा. महादुला, ता. कामठी, अश्विन विलास पाटील (३०, रा. नांदा, ता. कामठी) व पुरुषाेत्तम यादवराव शेंडे (३६, रा. बाभूळखेडा, ता. कामठी) यांचा समावेश आहे. खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नांदा शिवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली.
त्यांना जुगार आढळून येताच त्यांनी धाड टाकली. यात त्यांनी जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून ९,५०० रुपये राेख, ५१ हजार रुपये किमतीचे सात माेबाईल हॅण्डसेट आणि १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा माेटारसायकली असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे, मनाेज मेश्राम, आशिष भुरे, अमित खाेब्रागडे, गाेविंदा डाेईफाेडे यांच्या पथकाने केली.