सावंगी शिवारात जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:54+5:302021-04-21T04:08:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाेलिसांनी गस्तीदरम्यान सावंगी (ता. सावनेर) शिवारातील पांदण रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पाेलिसांनी गस्तीदरम्यान सावंगी (ता. सावनेर) शिवारातील पांदण रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्या १६ जणांपैकी पाच जणांना अटक करण्यात पाेलिसांना यश आले, तर ११ जण पळून गेले. त्यांच्याकडून राेख रक्कम व माेटरसायकली असा एकूण तीन लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १९) रात्री ९.५० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये प्रफुल्ल सुुनील ताजणे (२१, रा. नांदाेरी, ता. सावनेर), हेमराज विनायक तिबाेले (२४), भुवन भगवान बनारसी (२३) दाेघेही रा. हाेळी चाैक, सावनेर, विजय गणपत डाखेळे (३८, रा. किल्लापुरा, सावनेर), प्रवीण सुरेश भाेंडवे (२९, रा. पहलेपार, सावनेर) यांचा समावेश असून, विनाेद रमेश गुऱ्हारीकर, आकाश हिरालाल टिक्कस, प्रतीक ऊर्फ लारा भुमेश्वर खाेरगडे, तिघेही रा. पहलेपार, सावनेर, नितीन सहारे, रा. खानगाव, ता. सावनेर, आप्पा माने, रा. तेलगाव, ता. कळमेश्वर, मनाेज पिंगे, रा. नांदाेरी, ता. सावनेर यांच्यासह अन्य पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
सावनेर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सावंंगी शिवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली असता, त्यांना पांदण रस्त्यालगत जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पाेलिसांनी लगेच धाड टाकताच जुगार खेळणारे पाच जण पाेलिसांच्या हाती लागले तर इतर ११ जण पळून गेले. त्यामुळे पाेलिसांनी पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या नऊ माेटरसायकली व एक दुचाकी, ५,५०० रुपये राेख व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण तीन लाख १५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली असून, पसार जुगाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे, हवालदार पांडे, गाडगे, इंगाेले व दाेन हाेमगार्ड यांच्या पथकाने केली.