अवैध दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:11+5:302021-02-05T04:37:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांनी दहेगाव शिवारात राजराेसपणे सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर धाड टाकून दाेन महिलांसह चार आराेपींना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेलिसांनी दहेगाव शिवारात राजराेसपणे सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर धाड टाकून दाेन महिलांसह चार आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ८० लीटर दारूसह ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये विनाेद राजपूत (२८), रूपचंद्रा पवार (४०) यांच्यासह दाेन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील दहेगाव शिवारात अवैधरीत्या दारूभट्टी सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी दहेगाव शिवारात पाहणी करीत दारूभट्टीवर धाड टाकली. त्यात दाेन महिलांसह चार आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे २८ प्लास्टिक ड्रम, २२ लाेखंडी ड्रम, ८० लीटर दारू, १८०० लीटर माेहफूल सडवा, घमेले व इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक यशवंत साेलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक नीतेश डाेर्लीकर यांच्या नेतृत्वातील पाेलीस पथकाने केली.