भिवसनखोरीत अवैध दारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:26+5:302021-03-21T04:09:26+5:30
- झोन २ची धंतोली, सीताबर्डी पोलिसांसोबत संयुक्त कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गीट्टीखदान, भिवसनखोरी परिसरातील अवैध मोहाच्या दारू ...
- झोन २ची धंतोली, सीताबर्डी पोलिसांसोबत संयुक्त कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गीट्टीखदान, भिवसनखोरी परिसरातील अवैध मोहाच्या दारू अड्ड्यावर शनिवारी झोन २च्या चमूने छापे मारले. पोलिसांनी आरोपी रंजना काळबांडे (४५), महादेव उके (४७), लता कांबळे (४३), वसंतराव पाटी (५०), सुलेखाबाई कांबळे (५२), इंदुबाई घोडेस्वार (५६), विमलाबाई मेश्राम (५२), सीमाबाई खंडारे (३२) यांना आपल्या घरापुढे दारू तयार करताना पकडले आहे.
डीसीपी विनिता साहू यांना शुक्रवारी रात्री भिवसनखोरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात मोहाची दारू तयार केली जात असल्याची सूचना मिळाली. सूचनेनुसार शनिवारी मध्यरात्री ३.३० वाजता डीसीपीच्या विशेष पथकासह धंतोली व सीताबर्डी पोलीस ठाण्यातील चमूने छापा मारला. यावेळी ८ आरोपी वेगवेगळ्या स्थळांवर चुलीवर ड्रम ठेऊन दारू तयार करत होते. पोलिसांनी १८४ लीटर दारू, सहा हजार लीटर रसायन आणि ५ दुचाकींसह ४ लाख ८ हजार ५०० रुपयाचे साहित्य जप्त केले. आरोपींविरुद्ध मुंबई प्रोव्हिजन ॲक्टच्या कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत प्रकरण नोंदवले आहे.
.........