उमरेड शहरातील काेंबडा बाजारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:59+5:302021-09-08T04:12:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांच्या पथकाने उमरेड शहरातील इतवारी पेठ भागात सुरू असलेल्या काेंबडा बाजारावर धाड टाकली. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेलिसांच्या पथकाने उमरेड शहरातील इतवारी पेठ भागात सुरू असलेल्या काेंबडा बाजारावर धाड टाकली. यात काेंबड्यांच्या झुंजीवर जुगार लावणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून काेंबडे, त्यांच्या पायाला बांधलेल्या काती व राेख रक्कम असा एकूण १,०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ७) सायंकाळी करण्यात आली.
दिनेश केवळराम बालबुधे (वय २७, रा. कावरापेठ, उमरेड), नीलेश चिंतामन शिवरकर (२७, रा. बुधवारी पेठ, उमरेड) व मधुकर बापूराव जुनघरे (५०, रा. वेकोली वसाहत, उमरेड) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी जुगाऱ्यांची नावे आहेत. उमरेड शहरातील इतवारी पेठेतील सार्वजनिक ठिकाणी काेंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळला जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.
पाेलिसांच्या पथकाने लगेच या भागाची पाहणी केली. त्यांना काेंबडा बाजार आढळून येताच धाड टाकली व जुगार खेळणाऱ्या तिघांना ताब्यात घेत अटक केेली. पाेलीस येताच इतरांनी तिथून पळ काढला. आराेपींकडून झुंजीसाठी वापरलेले दाेन काेंबडे, त्यांच्या पायाला बांधलेल्या काती (शस्त्र) व राेख रक्कम असा एकूण १,०२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार यशवंत सोलसे यांनी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे, अंमलदार प्रदीप चवरे, ओमप्रकाश रेहपाडे, रुपेश महाजन, राधेश्याम कांबळे यांच्या पथकाने केली.