माेहफूल दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:36+5:302021-03-08T04:09:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी नेरी (ता. कामठी) शिवारातील कन्हान नदी परिसरात आलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी नेरी (ता. कामठी) शिवारातील कन्हान नदी परिसरात आलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ७) दुपारी करण्यात आली.
जितेंद्र सावजी तांडेकर (३५, रा. कन्हान पिपरी, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नेरी शिवारात माेहफुलाची दारूभट्टी असल्याची माहिती कामठी (नवीन) पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या शिवाराची पाहणी केली. त्यात त्यांना कन्हान नदीच्या परिसरात दारूभट्टी आढळून येताच लगेच धाड टाकली. यात त्यांनी आराेपी जितेंद्रला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून एमएच-४०/एडब्ल्यू-४९२७ व एमएच-४०/एवाय-८४५८ क्रमांकाच्या दाेन माेटरसायकली, दारू, दारू काढण्याचे साहित्य जप्त केले. माेटरसायकली व ड्रम वगळता संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक एस. कार्वेकर व नितीन धोंगडे, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, अखिलेश राय, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, राहुल वाघमारे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप भोयर, मनोहर राऊत, नीलेश यादव, अनिल बाळराजे, प्रमोद वाघ यांच्या पथकाने केली.