माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:33+5:302021-05-07T04:09:33+5:30
केळवद : पाेलीस पथकाने छत्रापूर खदान (ता. सावनेर) परिसरातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली. कारवाईदरम्यान सात आराेपी ...
केळवद : पाेलीस पथकाने छत्रापूर खदान (ता. सावनेर) परिसरातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली. कारवाईदरम्यान सात आराेपी पसार झाले. या कारवाईत माेहफुलाच्या दारूसह ७ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.६) सकाळच्या सुमारास करण्यात आली.
छत्रापूर खदान परिसरातील बाेरगाव तलाव काठावर माेहफुलाची दारूभट्टी सुरू असल्याची गुप्त सूचना केळवद पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी दारूभट्टीवर धाड टाकली. पाेलीस पथक घटनास्थळी पाेहचताच सात आराेपी तलावातून पाेहून पसार झाले. मुकेश मारवाडी, तारासिंह पवार, रतन राजपूत, जगदीश अलघरे, किशाेर मारवाडी, संदीप राजपूत, दिलीप राजपूत अशी फरार आराेपींची नावे आहेत. पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून तेथील ६,२०० लिटर माेहफुलाची दारू, रसायन सडवा व दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण ७ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, शिवाय पाेलिसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त केली.
याप्रकरणी केळवद पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई प्रभारी ठाणेदार माराेती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड, अमरदीप कामठे, माेरेश्वर नांदेकर, अश्विनी निकाेसे, पूनम त्रिपाठी, धाेंडूतात्या देवकते, रवींद्र चटप, गुणेश्वर डाखाेळे, पंकज काेहाड, हाेमगार्ड सुनील झाडे, सुजित दगडे, हर्षल देवलकर, महेंद्र भाेयर यांच्या पथकाने केली.