माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:06+5:302021-05-13T04:09:06+5:30
पवनी (रामटेक) : सर्वत्र काेराेनाचा प्रकाेप वाढत असतानाच ग्रामीण भागात अवैध दारूभट्टी व विक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, देवलापार ...
पवनी (रामटेक) : सर्वत्र काेराेनाचा प्रकाेप वाढत असतानाच ग्रामीण भागात अवैध दारूभट्टी व विक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, देवलापार पाेलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून, पाच आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून माेहफुलाची दारू, रसायन सडवा इतर साहित्य असा एकूण २ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.१२) करण्यात आली.
चाेरबाहुली, नवेगाव चिचदा व कट्टा शिवारात हातभट्टी लावून माेहफुलाची दारू काढली जात असल्याची गुप्त सूचना देवलापार पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलीस पथकाने तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली असता, आराेपी कमलाकर पंधरे, अर्जुन यशवंत काेकडे दाेन्ही रा. चाेरबाहुली, सुरीवंद तुमडाम, नथ्थू साेनवणे दाेन्ही रा. चिचदा व संतलाल काेकडे रा. कट्टा, ता. रामटेक हे माेहफुलाची दारू गाळताना आढळून आले. पाेलिसांनी पाचही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. या कारवाईत माेहफुलाची दारू, रसायन सडवा व एमएच-३१/पीएन-६२३४ क्रमांकाची दुचाकी असा एकूण २ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी आराेपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक के. जी. पुंजरवाड, महिला उपनिरीक्षक लक्ष्मी घाेडके, संदीप नागाेसे, सतीश नागपुरे, अमाेल वाघ, रमेश खरकटे, गजानन जाधव, संताेष वाट यांच्या पथकाने केली.