नागपुरात आॅनलाईन जुगार अड्ड्यावर छापा : १०.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:17 PM2018-01-11T23:17:19+5:302018-01-11T23:28:32+5:30

ठिकठिकाणच्या जुगाऱ्यांना एकाच लाईनवर (आॅनलाईन) एकत्र करून तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार खेळून घेणाऱ्या  १२ आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह १० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Raid on online gambling dent in Nagpur: 10.87 lakh worth of money seized | नागपुरात आॅनलाईन जुगार अड्ड्यावर छापा : १०.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपुरात आॅनलाईन जुगार अड्ड्यावर छापा : १०.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देवर्धेचे १२ जुगारी गजाआड : लकडगंज पोलिसांची कारवाईशहरातील पहिली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या जुगाऱ्यांना एकाच लाईनवर (आॅनलाईन) एकत्र करून तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार खेळून घेणाऱ्या  १२ आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह १० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारची आॅनलाईन जुगार अड्ड्यावरील ही शहरातील पहिली कारवाई आहे.
आरोपी अंकुश भगवान पंजवानी (वय २८, रा. दयालनगर, वर्धा) याने महिनाभापूर्वी वर्धमाननगरातील नीलेश ढिंगरा यांची सदनिका भाड्याने घेतली. पूजा सोसायटीतील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या या सदनिकेत पंजवानीने आॅनलाईन लॉटरीप्रमाणे आॅनलाईन तीन पत्तीचा जुगार सुरू केला. दिवसभरात लाखो रुपयांचे कमिशन मिळविणाºया आरोपी पंजवानीने हा जुगार खेळून घेण्यासाठी रवी हुंदराज नानवानी (वय १९, रा. दयालनगर) यालाही आपला विश्वासू म्हणून याच सदनिकेत ठेवले आणि तेथे तीन पत्तीचा आॅनलाईन जुगार सुरू केला. असंख्य जुगारी लाखोंची हारजिीा करीत असल्यामुळे पंजवानीने नानवानीसोबतच हा जुगार खेळून घेण्यासाठी (खायवाडी-लगवाडीसाठी) अनिकेत शंकर ढाले (वय १८, रा. गणेशनगर, बोरगाव मेघे, वर्धा), बादल उत्तम बावणे (वय १८, रा. मास्टर कॉलनी सावंगी, जि. वर्धा), गजेंद्र पुंडलिकराव फटिंग (वय १९, रा. गणेशनगर कळंबे लेआऊट, वर्धा), मंगेश अनिल महाकाळकर (वय २५, रा. स्टेशन फैल, वर्धा), शुभम भारत गणवीर (वय २०, रा. दयालनगर, वर्धा), सुरेश श्रावण वाकडे (वय २३, रा. कोरा, समुद्रपूर, ज. वर्धा), सुजित बाबूलाल फुलमाळी (वय १८, रा. हिवरा-सेलू, जि. वर्धा), अक्षय अशोक मेंढे (वय २०, रा. दयालनगर वर्धा), पंकज बजरंग वाघमारे (वय १९,रा. स्टेशन फैल, वर्धा) आणि अनिल मुकुंदराव डोंगरे (वय २४, रा. रेल्वे स्थानकाजवळ वर्धा) यांनाही सोबत घेतले.
मोबाईलमध्ये चीप्स बसवून आॅनलाईन जुगार डाऊनलोड करून पंजवानी आपल्या साथीदारांच्या मदतीने जुगाºयांना जुगार खेळायला भाग पाडत होता. त्याच्या या गोरखधंद्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळताच बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ढिंगरा यांच्या सदनिकेत छापा घातला.
यावेळी उपरोक्त १२ आरोपी तेथे तीन पत्ती (ब्लार्इंड) जुगार खेळावर पैशाची लगवाडी-खायवाडी करून घेताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकाच कंपनीचे १०५ मोबाईल, रोख ७ हजार आणि अन्य साहित्यासह १० लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पॉर्इंटचे नाव अन् पैशाचा खेळ
पोलिसांनी पंजवानीला ताब्यात घेतल्यानंतर हा जुगार कसा भरवला जातो आणि ठिकठिकाणचे जुगारी एकाच वेळी ते कसा खेळतात, कशी पैशांची हारजित होते, त्याबाबत आरोपींकडून माहिती जाणून घेतली. त्यानुसार संकेतस्थळावर गेल्यानंतर या जुगारात सहभागी होता येते. जुगाऱ्याला विशिष्ट रकमेत विशिष्ट किमतीचे पॉर्इंट खरेदी करून जुगारात सहभागी होता येते. तो ती रक्कम (पॉर्इंट) हरला तर त्याला पुन्हा आॅनलाईन पेमेंट करून पॉर्इंट विकत घ्यावे लागतात. जिंकला तर तेवढे पॉर्इंट (रक्कम) त्याच्या खात्यात जमा होते. बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असणारेच हा जुगार खेळतात. हा जुगार भरविणाऱ्या पंजवानीसारख्याला दिवसाकाठी लाखोंचे कमिशन मिळते.
वर्धा येथे झाली होती कारवाई
सर्वच्यासर्व आरोपी वर्धा येथील रहिवासी आहेत. काही जण नागपुरात भाड्याने राहतात तर काही जण येणे-जाणे करतात. पंजवानी गेल्या वर्षीपर्यंत हा जुगार अड्डा वर्धेतून चालवायचा. तेथील पोलिसांनी छापा घातल्यामुळे पंजवानीने वर्धा येथून गाशा गुंडाळला आणि दीड ते दोन महिन्यांपूर्वी आरोपी पंजवानीने १५ हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने ढिंगरांकडून सदनिका भाड्याने घेत येथे हा अड्डा सुरू केला होता. पोलिसांनी बुधवारी तेथे छापा घालताच येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात उपनिर्रीक्षक पीजी गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार त्रियोगी तिवारी, दीपक कारोकार, अजय रोडे, नायक रंजित सेलकर, शुनील ठवकर, सतीश पांडे, भूषण झाडे, शिवराज पाटील, प्रवीण गाणार आदींनी बजावली.

Web Title: Raid on online gambling dent in Nagpur: 10.87 lakh worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.