कामठीतील देहव्यापार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:02+5:302021-02-05T04:38:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील रमानगर भागात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकत पाच जणांना अटक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील रमानगर भागात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकत पाच जणांना अटक केली. आराेपींमध्ये दाेन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ही कामठी शहरातील देहव्यापारातील आजवरची सर्वात माेठी कारवाई मानली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये दिनेश छोटू शेट्टी (४३, रा. भानखेडा, नागपूर), युवराज पांडुरंग डोमके (५२, रा. फेटरी, ता. नागपूर ग्रामीण), हर्षल चंद्रहास लाहुड (१९, रा. रमानगर, कामठी) या तिघांसह दाेन महिलांचा समावेश आहे. रमानगर, कामठी येथे राहणारी ४९ वर्षीय महिला तिच्या घरी कुंटनखाना चालवित असल्याची तसेच ती महिला विविध वयाेगटातील तरुणी व महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पाेलिसांना प्राप्त झाली हाेती.
त्यामुळे पाेलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सत्यता पटवून घेतली. खात्री हाेताच बनावट ग्राहकाच्या सूचनेवरून परिसरात दबा धरून बसलेल्या पाेलीस पथकाने लगेच धाड टाकली आणि त्या घरातून त्यांनी तिघांसह दाेन महिलांना ताब्यात घेत अटक केली. शिवाय घटनास्थळाहून दारूचा साठा, राेख रक्कम, कंडाेम व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण ३७ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय मेंढे, दुय्यम पाेलीस निरीक्षक राधेश्याम पाल, सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक विनायक आसतकर, मनाेहर राऊत, अनिल बाळराजे, नीलेश यादव, ललित शेंडे, राेशन पाटील, मनीषा माहुर्ले, सुजाता कर्वे यांच्या पथकाने केली.