नागपुरात स्पा सलूनवर छापा : कुंटणखान्याचा पर्दाफाश , चार वारांगना सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 23:36 IST2020-10-29T23:35:14+5:302020-10-29T23:36:28+5:30
Raid on spa salon, prostotution racket bursted, crime news, Nagpur स्पा सलूनच्या आड कुंटणखाना चालविणाऱ्या एका जोडगोळीच्या स्पा सलूनवर छापा घालून गुन्हेशाखेच्या पथकाने तेथील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या ठिकाणी पोलिसांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार वारांगनाही आढळल्या.

नागपुरात स्पा सलूनवर छापा : कुंटणखान्याचा पर्दाफाश , चार वारांगना सापडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्पा सलूनच्या आड कुंटणखाना चालविणाऱ्या एका जोडगोळीच्या स्पा सलूनवर छापा घालून गुन्हेशाखेच्या पथकाने तेथील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या ठिकाणी पोलिसांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार वारांगनाही आढळल्या.
अत्यंत हायप्रोफाईल अशा धरमपेठ भागातील ट्राफिक चिल्ड्रेन पार्कजवळ शिवगौरव अपार्टमेंटमध्ये आरोपी अंजली शहा ऊर्फ वर्षा रामटेके आणि रजत ठाकूर या दोघांनी स्पा सलूनच्या आड कुंटणखाना सुरू केला होता. शहरातील अनेक वारांगनांना बोलवून ते तेथे त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. या प्रकाराची कुणकूण लागताच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, अतुल इंगोले, हवालदार अनिल अंबादे, भूषण झाडे, शिपाई अजय पौनीकर, सुधीर तिवारी, रिना जाऊरकर, कुमुदिनी मेश्राम, सुजाता पाटील यांनी आज सापळा रचून कुंटणखान्यावर छापा मारला. तेथे चार वारांगना आढळल्या. अंजली ऊर्फ वर्षा आणि रजत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाल्याने या दोघांना अटक करण्यात आली.