गावठी दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:16+5:302021-05-06T04:08:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पाेलीस पथकाने बच्छेरा टाेली (ता. पारशिवनी) शिवारातील माेहफुलाच्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकून दारू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलीस पथकाने बच्छेरा टाेली (ता. पारशिवनी) शिवारातील माेहफुलाच्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकून दारू गाळणाऱ्या दाेन आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून माेहफुलाच्या दारूसह १ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.४) दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रमेश शालिकराम काेरचे (३८) व रवींद्र फजितराव मडावी (२१) दाेघेही रा. बनेरा टाेली, ता. पारशिवनी, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बच्छेरा टाेली शिवारात गावठी दारूभट्टी चालवून माेहफुलाची दारू गाळली जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी शेतशिवारात पाहणी करीत दारूभट्टीवर धाड टाकली असता, दाेन्ही आराेपी माेहफुलाची दारू गाळताना आढळून आले. पाेलिसांनी आराेपींना अटक करून त्यांच्याकडून ५५ हजार रुपये किमतीची ११० लिटर माेहफुलाची दारू, ३०० लिटर माेहफूल रसायन सडवा व दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण १ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, शिवाय पाेलिसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त केली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी कलम ६५ (इ),(एफ),(सी), ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार संताेष वैरागडे, पाेलीस उपनिरीक्षक संदीप उबाळे, पाेलीस नाईक संदीप कडू, महेंद्र जळीतकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.