अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:06+5:302021-05-28T04:08:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : लाॅकडाऊन काळात अवैध दारूविक्रीला उधाण आले असतानाच सावनेर पाेलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : लाॅकडाऊन काळात अवैध दारूविक्रीला उधाण आले असतानाच सावनेर पाेलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली. या पथकांनी एकूण १० ठिकाणी कारवाई करीत तीन अवैध दारू विक्रेत्यांसह दारू पिणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून दारू व इतर साहित्य जप्त केले.
सावनेर पाेलिसांच्या पथकाने सावनेर शहरातील पहलेपार येथील शाळेजवळ धाड टाकली. यात मनीष पितांबर पंडिया, रा. पहलेपार, सावनेर यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ४,५०० रुपयाची ४५ लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. याच पथकाने शहरातील नेहरू मार्केट जवळील सार्वजनिक खुल्या जागेत दारू पिणाऱ्यांनाही पकडले. यात आकाश सुरेश डेहरिया (२९, रा. वेकोलि काॅलनी, सावनेर) प्रवीण भारत सलामे (२४, रा. बानाबाकोडा, ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश), दादाराव गोविंदा बावणे (४७, रा. माळेगाव, ता. सावनेर), सतीश दादाराव खरात (३०, रा. रेल्वेस्थानकामागे सावनेर), विक्रांत जयराम मरस्कोल्हे (२६, रा. अजनी, ता. सावनेर) या आराेपींचा समावेश आहे.
पाेलिसांनी सावनेर शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील १० दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात दाेन हजार रुपयाची २० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. शिवाय, संदीप बसवार रा. पहलेपार, सावनेर या अवैध दारू विक्रेत्यास अटक केली. चिचपुरा, सावनेर परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाची १५ लिटर दारू जप्त केली असून, त्या दारूची किंमत १,५०० रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
यात किशोर मोतीराम सहारे (५३, रा. चिचपुरा, सावनेर) यास अटक केल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, उपनिरीक्षक सागर कारंडे, सहायक फौजदार राजेंद्र यादव, पोलीस नायक मनीषा बंडीलवार, शिपाई नीलेश तायडे, प्रकाश ठोके, गणेश उईके यांच्या पथकाने बजावली.
...
सट्टापट्टी स्वीकारणारे अटकेत
सावनेर पाेलिसांच्या पथकाने पिपळा (किनखेडे) येथे धाड टाकत सट्टापट्टी स्वीकारणाऱ्यास अटक केली. या कारवाईमध्ये दिनेश सुखदेव भारती (४२, रा. पिपळा-किनखेडे, ता. कळमेश्वर) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३२० रुपये राेख व इतर साहित्य असा एकूण ३३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ताे प्रवीण शेटे रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर याच्या सांगण्यावरून सट्टापट्टी स्वीकारत असल्याची माहितीही पाेलिसांनी दिली.