शुभंकरोती किल्ले स्पर्धेत छावा प्रतिष्ठानचा 'रायगड' प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:15 PM2019-11-04T23:15:59+5:302019-11-04T23:18:11+5:30
महाल भागातील ‘शुभंकरोती’ व बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात छावा प्रतिष्ठानचा किल्ले रायगड व छोट्या गटात काशीनगर बाल मंडळाच्या किल्ल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाल भागातील ‘शुभंकरोती’ व बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात छावा प्रतिष्ठानचा किल्ले रायगड व छोट्या गटात काशीनगर बाल मंडळाच्या किल्ल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छोट्या गटात अजय इंगळे यांच्या शिव ग्रुपला द्वितीय पुरस्कार मिळाला. तर मोठ्या गटात मंदार व अर्णव उट्टलवार यांचा सिंहगड व पुष्कर दहासहस्र, अजिंक्य जोशी यांच्या लोहगडला संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला. रोहित लाडसावंगीकर यांच्या काल्पनिक रोहिडा यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला. यासोबतच मंगेश बारसागडे यांचा काल्पनिक, विशाल देवकरचा प्रचंडगड, आदित्य-अनघा मल्टीस्टेट, चेतन सावरकर, निखील व कुणाल शेंडे यांचा शिवनेरी, स्वा. सावरकर विद्यालयाचा काल्पनिक किल्ला, प्रवीण दिग्रसकर, कीर्ती दुबे, नवशक्ती गणेश मंडळ, अभिषेक कळमकर यांचा काल्पनिक किल्ला तसेच छोट्या गटात पार्थ हरदास, रुद्राक्ष मुदलियार, शिवम मारडवार, मधूर तीर्थकार, श्रेयस कळमकर, अर्णव हाडे, दिव्यांशु कावळे, अंशुल बागवाले, राहुल निंबाळकर यांच्या किल्ल्यांना पारितोषिके देण्यात आली. रांगाळी स्पर्धेमध्ये अश्विनी अतकर, साधना चेडगे, हर्षदा गोजे, श्रेया पाध्ये, साधना विंचूरकर, अपर्णा ठाणेकर, नीलिमा धोपटे, प्राजक्ता वैद्य, प्राजक्ता धामणकर, वैशाली खरोडे, रजनी तीनखेडे, कविता वाकोडीकर यांना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस बिनतारी संदेश विभागातील व प्राचीन कला अभ्यासक प्रवीण योगी, रा.स्व.संघाचे मोहिते नगर संघचालक सुधीर दप्तरी, नगरसेविका श्रद्धा पाठक व शुभंकरोती संयोजक मनोज वैद्य उपस्थित होते. सुनील हमदापुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन उर्वशी गोरेगावकर व आकांक्षा वैद्य यांनी केले तर प्राजक्ता जोशी हिने आभार मानले.