गणेश चतुर्थी आणि दिवाळी पूजनाला रेल्वे बुकिंग काउंटर ओपन
By नरेश डोंगरे | Published: September 7, 2023 09:25 PM2023-09-07T21:25:33+5:302023-09-07T21:25:58+5:30
प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे
नरेश डोंगरे - नागपूर
नागपूर : गणेश चतुर्थी आणि दिवाळीच्या सणाला प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेने पाचही विभागांत रेल्वेचे पीआरएस आरक्षित तिकीट बुकिंग काउंटर ओपन ठेवण्याची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीला १९ सप्टेंबर रोजी मंगळवार येतो.
या दिवशी तसेच मंगळवारी, १४ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या पाचही विभागांतील मध्य रेल्वेचे सर्व बुकिंग काउंटर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. त्यामुळे प्रवासी या काउंटरवर नेहमीप्रमाणे बुकिंग करू शकणार आहेत. मात्र, दुपारी २ ते रात्री १० या वेळेत हे काउंटर बंद ठेवण्यात येतील, प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.