रेल्वे वाहतुकीला लागला ‘ब्रेक’

By admin | Published: June 20, 2015 03:04 AM2015-06-20T03:04:15+5:302015-06-20T03:04:15+5:30

नागपुरातून चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. परंतु शुक्रवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इटारसीत ....

Railway breaks in 'Brake' | रेल्वे वाहतुकीला लागला ‘ब्रेक’

रेल्वे वाहतुकीला लागला ‘ब्रेक’

Next

१९ गाड्या रद्द : चारही दिशांची वाहतूक विस्कळीत
नागपूर : नागपुरातून चारही दिशांना रेल्वेगाड्या जातात. परंतु शुक्रवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इटारसीत दोन दिवसांपूर्वी आरआरआय कॅबिनमध्ये झालेल्या आगीच्या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून प्रवाशांचीही प्रचंड गैरसोय होत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १९ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला. यातील काही रेल्वेगाड्या २० जूनच्या तर काही २१ जूनच्या आहेत. याशिवाय १३ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून १० रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. यात आंध्रप्रदेश एक्स्प्रेस १० तास, गोरखपूर-कृष्णराजारामपुरम स्पेशल ९ तास, निजामुद्दीन-बेंगळुरु राजधानी एक्स्प्रेस १.५० तास, मुंबई-हावडा समरसता एक्स्प्रेस १० तास, पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस ६ तास, नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ७ तास, नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ६ तास, बेंगळुरु-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २ तास, सिकंदराबाद-पटना संघमित्रा एक्स्प्रेस १० तास, मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस ५.१५ तास आदींचा समावेश आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सेवाग्राम एक्स्प्रेसला इगतपुरीत संपविण्यात आले. शुक्रवारी सेवाग्राम एक्स्प्रेस इगतपुरीतून नागपूरसाठी रवाना झाली. मुंबईवरून हावडा आणि इतर भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी १२१६७ एलटीटी-वाराणशी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ११०७१ एलटीटी-वाराणशी कामायनी एक्स्प्रेस, १५१०२ सीएसटी-छपरा एक्स्प्रेस, १२१६१ एलटीटी-आगरा कँट, १२१४२ राजेंद्रनगर-एलटीटी, १२१५४ हबीबगंज-एलटीटी आणि १२१८७ जबलपूर-सीएसटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून तात्काळ तिकिटाच्या प्रवाशांना आॅनलाईन रक्कम परत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मार्ग बदलविलेल्या रेल्वेगाड्या
रामेश्वरम-वाराणसी एक्स्प्रेस, बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस, निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस, यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेस, म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस, पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस, रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, सिकंदराबाद-पटना स्पेशल, भगत की कोठी-मन्नारगुडी एक्स्प्रेस, सिकंदराबाद-गोरखपूर एक्स्प्रेस, चेन्नई-बिकानेर एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२० जून)
विशाखापट्टणम-निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस, जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस, जयपूर-नागपूर एक्स्प्रेस, दानापूर-यशवंतपूर पाटलीपुत्र एक्स्प्रेस, पूर्णा-पटना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय २१ जूनची जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, कन्याकुमारी-जम्मूतावी एक्स्प्रेस आणि २३ जूनची यशवंतपूर-लखनौ एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Railway breaks in 'Brake'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.