रेल्वेची कॅशलेस सुविधा दोषपूर्ण; खात्यातून पैसे डेबिट, तिकीट मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:50 AM2019-03-12T10:50:46+5:302019-03-12T10:51:16+5:30
तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅशलेस व्यवहार वाढावेत, प्रवाशांना जवळ पैसे न बाळगता रेल्वेचे तिकीट खरेदी करता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दोन वर्षांपूर्वी एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनच्या साह्याने तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु अलीकडच्या काळात ही सुविधा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यात प्रवाशांचा रेल्वेच्या बुकिंग क्लार्कसोबत वाद होत असून, ही सुविधा प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कसाठी डोकेदुखी ठरत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरुवातीला नागपूर रेल्वेस्थानकावर एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनने तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा विभागातील सर्वच आरक्षण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली. सुरुवातीला ही सुविधा विनाव्यत्यय सुरू राहिली. परंतु मागील आठ ते दहा महिन्यांपासून या सुविधेमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यात तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशाने आपले एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, रुपीज कार्ड अशा तक्रारी वाढल्या आहेत. यात प्रवाशांचा रेल्वेच्या बुकिंग क्लार्कसोबत वाद होत असून, ही सुविधा प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कसाठी डोकेदुखी ठरत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरुवातीला नागपूर रेल्वेस्थानकावर एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वाईप मशीनने तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सुविधा विभागातील सर्वच आरक्षण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली. सुरुवातीला ही सुविधा विनाव्यत्यय सुरू राहिली. परंतु मागील आठ ते दहा महिन्यांपासून या सुविधेमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यात तिकीट काढण्यासाठी गेलेल्या प्रवाशाने आपले एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, रुपीज कार्ड, डिनर कार्ड, मास्टर कार्ड, मॅस्ट्रो कार्ड यापैकी एक कार्ड दिल्यानंतर ते स्वाईप मशीनमध्ये टाकताच प्रवाशाच्या खात्यातून पैसे कापल्या जात आहेत. परंतु ते पैसे तांत्रिक दोषामुळे रेल्वेच्या खात्यात जमा होत नाहीत. यामुळे आरक्षण काऊंटरवरील क्लर्क त्या प्रवाशाला तिकीट देत नाही. यात प्रवासी आणि संंबंधित रेल्वे कर्मचाऱ्यात वाद होत आहेत.
ऐनवेळी पैसे आणावेत कुठून?
एखाद्या प्रवाशाच्या खात्यात दोन हजार रुपये आहेत आणि त्याने रेल्वेचे आरक्षणाचे तिकीट खरेदी करण्यासाठी आपले एटीएम कार्ड दिले. परंतु तांत्रिक दोषामुळे त्याच्या बँक खात्यातून पैसे कपात झाले अन् ते रेल्वेच्या खात्यात जमा झाले नाही, अशा वेळी तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
‘रेल्वेने स्वाईप मशिन अंतर्गत तयार केलेली यंत्रणा दोषपूर्ण आहे. यात प्रवासी आणि रेल्वे बुकिंग क्लार्कमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा सदोष यंत्रणेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचा विरोध आहे. रेल्वेने या यंत्रणेत सुधारणा न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.’
- वीरेंद्र सिंग, विभागीय अध्यक्ष,
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग
‘प्रवाशांच्या हिताच्या दृष्टिकोनातून रेल्वेने स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची यंत्रणा सुरू केली. परंतु या यंत्रणेत प्रवाशांना त्रास होत आहे. रेल्वेने या यंत्रणेतील त्रुटी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे. याशिवाय रेल्वेने आरक्षणाच्या काऊंटरची संख्या वाढवावी.’
- बसंत कुमार शुक्ला, झोनल सदस्य, मध्य रेल्वे