नागपूर-दिल्ली मार्गावर रेल्वे इंजिन रुळावरून घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:49 PM2019-12-23T22:49:19+5:302019-12-23T22:50:23+5:30

नागपूर-दिल्ली मार्गावर कोहळी रेल्वे स्थानकाच्या इटारसी एन्डवर सोमवारी दुपारी एक इंजिन रुळावरून घसरले. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही.

Railway Engine derailed on Nagpur-Delhi route | नागपूर-दिल्ली मार्गावर रेल्वे इंजिन रुळावरून घसरले

नागपूर-दिल्ली मार्गावर रेल्वे इंजिन रुळावरून घसरले

Next
ठळक मुद्देकोहळी रेल्वे स्थानकावरील घटना : वाहतुकीवर पडला नाही परिणाम

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूर-दिल्ली मार्गावर कोहळी रेल्वे स्थानकाच्या इटारसी एन्डवर सोमवारी दुपारी एक इंजिन रुळावरून घसरले. यामुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर फारसा परिणाम पडला नाही.
कोहळी रेल्वे स्थानकावर दुपारी २.३० वाजता गुड्स इंजिन क्रमांक ३२४२५ लुप लाईनवरून मेन लाईनवर जात होते. रुळ बदलण्याच्या पॉर्इंटवर इंजिन रुळाखाली घसरले. इंजिनची पुढील चार चाके रुळावरून घसरली. घटनेची माहिती मिळताच अजनीवरून अ‍ॅक्सिडंट रिलिफ ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. जवळपास चार तासानंतर सायंकाळी ६.२० वाजता हे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळाले.
दक्षिण एक्स्प्रेसला उशीर
मेन लाईनवर रेल्वे इंजिन रुळाखाली घसरल्यानंतरही याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम पडला नाही. नागपूरकडून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. दुसऱ्या मेन लाईनवरून रेल्वेगाड्यांना रवाना करण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी काही वेळ दोन्ही मेन लाईन बंद करण्यात आल्या. यामुळे १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसला ५३ मिनिटांचा विलंब झाला.

Web Title: Railway Engine derailed on Nagpur-Delhi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.