रेल्वेची दिवाळीत मुंबई, पुण्याच्या प्रवाशांना भेट : अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:47 PM2019-10-24T19:47:31+5:302019-10-24T19:50:53+5:30
दिवाळीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावर तर फार मोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीतरेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावर तर फार मोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ८२१२६ नागपूर-पुणे सुविधा विशेष नागपूरवरून बुधवारी ३० ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ९.४०, सेवाग्राम १०.४०, वर्धा १०.५०, पुलगाव ११.२०, धामणगाव ११.४०, बडनेराला १२.४२ आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण १९ कोच आहेत. त्यात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १२ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, २ एसएलआर कोचचा समावेश आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२०२४ नागपूर-मुंबई सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून सोमवारी २८ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ९.४०, सेवाग्रामला १०.४०, वर्धा १०.५०, पुलगावला ११.२०, धामणगावला ११.४०, बडनेरा १२.४२, अकोला १.४० आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण १९ कोच आहेत. यात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १२ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, २ एसएलआर कोचचा समावेश आहे. दोन्ही गाड्यांचे आरक्षण २५ ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रात उपलब्ध होणार आहे.