रेल्वे हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:06 AM2017-10-15T01:06:37+5:302017-10-15T01:06:50+5:30

दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे तर अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे.

Railway HouseFull! | रेल्वे हाऊसफुल्ल!

रेल्वे हाऊसफुल्ल!

Next
ठळक मुद्देवेटिंग वाढले; प्रवाशांची गैरसोय : ट्रॅव्हल्स संचालकांनी वाढविले तिकिटांचे दर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे तर अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. प्रवाशांची या काळात होणारी गर्दी पाहता खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही तिकिटांच्या दरात वाढ केल्यामुळे दिवाळीत प्रवाशांची लूट होत असल्याची स्थिती आहे.
नागपुरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीच्या काळात नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये १०० ते १७७ वेटिंग, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १४६, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २७ आॅक्टोबरला १५० वेटिंग आहे. तर १२२९० दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत १८२ वेटिंग आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये २० आॅक्टोबरला १२३ वेटिंग, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ आॅक्टोबरला २८९ वेटिंग आहे. दिल्लीकडे जाणाºया गाड्यात १२६५१ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ४५ वेटिंग आणि २३ आॅक्टोबरला ४४ वेटिंग आहे. १२६१५ नागपूर-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये २१ आॅक्टोबरला रिग्रेट, २२ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२७२१ नागपूर-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला रिग्रेट, १९ आॅक्टोबरला ९५ वेटिंग, २१ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. हावडा मार्गावर १२८५९ नागपूर-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ९७ वेटिंग, २० आॅक्टोबरला ८१ वेटिंग, २१ आॅक्टोबरला ८३ वेटिंग आहे. १२१२९ आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ९८ वेटिंग, १९ आॅक्टोबरला ४२ वेटिंग आणि २० आॅक्टोबरला ७१ वेटिंग आहे. १८०२९ शालिमार एक्स्पे्रसमध्ये १८ आॅक्टोबरला १०० वेटिंग, १९ आॅक्टोबरला ५२ वेटिंग आणि २० आॅक्टोबरला ८२ वेटिंग आहे.
चेन्नईकडे जाणाºया गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेसमध्ये २० आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८१ आणि २३ आॅक्टोबरला ३८ वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाड्यातील वेटिंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, त्यांना विना बर्थचा प्रवास करावा लागणार आहे. प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी अनेक प्रवासी तात्काळच्या रांगेत उभे राहून बर्थ मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपल्या भाड्यात मोठी वाढ केली असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यात पुण्याला जाणाºया प्रवाशांना ९०० रुपयांऐवजी २६०० रुपये मोजावे लागत आहेत. तर कोल्हापूरला जाणाºया प्रवाशांना १३०० रुपयांचे तिकीट २५०० रुपये देऊन खरेदी करावे लागत आहे. हैदराबादला जाणाºया प्रवाशांना ८०० रुपयांचे तिकीट १८०० ते २ हजार रुपयांना खरेदी करण्याची पाळी आली आहे. दिवाळी संपल्यानंतर चार ते पाच दिवस तिकिटांचे दर हे असेच राहणार असल्याची माहिती खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.

Web Title: Railway HouseFull!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.