रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:19 AM2019-10-29T00:19:30+5:302019-10-29T00:20:32+5:30

गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.

Railway line break: Railway accident has been avoided between Ajani-Khapri | रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

Next
ठळक मुद्देगँगमनने दिली वेळीच सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वेअपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११ वाजता अजनी-खापरी सेक्शनमध्ये गँगमन गस्त घालत होते. यातील एका गँगमनला डाऊन लाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब दृष्टीस पडली. यामुळे रेल्वे रुळामध्ये ५५ एमएमची गॅप पडली होती. या रेल्वे रुळावरून रेल्वेगाडी गेली असती तर अपघात होण्याची शक्यता होती. तेवढ्यात नागपूरवरून सुटलेली रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस डाऊन लाईनवरून जाणार होती. या गाडीला येताना पाहून गँगमनने लाल झेंडी दाखवून गाडीला थांबण्याची सूचना केली. लोकोपायलटने याची सूचना गार्ड पी. विश्वनाथ यांना दिली. त्यांनी गाडी थांबविण्याचे निर्देश दिले. तडा गेलेल्या रेल्वे रुळाच्या आधीच गाडी इमर्जन्सी ब्रेक लावून थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. या कामात ५० मिनिटांचा वेळ लागला. तोपर्यंत अंदमान एक्स्प्रेस अडकून पडली. या मार्गावरून रवाना होणाऱ्या इतर गाड्यांना रेल्वेस्थानकवर थांबविण्यात आले. यामुळे दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. गँगमनच्या लक्षात वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वेगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूरला नागपूर रेल्वेस्थानकावर १३ मिनिटे रोखून धरण्यात आले.

Web Title: Railway line break: Railway accident has been avoided between Ajani-Khapri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.