लोहमार्ग पोलिसांनी महिलेची पर्स केली परत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:40+5:302021-07-27T04:09:40+5:30
दुर्ग येथील रहिवासी नेहा अशोक गीतांजली एक्स्प्रेसने हावडा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. सकाळी ७.३० वाजता त्या नागपूर ...
दुर्ग येथील रहिवासी नेहा अशोक गीतांजली एक्स्प्रेसने हावडा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. सकाळी ७.३० वाजता त्या नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यानंतर गाडीखाली उतरल्या. प्रवाशांच्या गर्दीत उतरताना धावपळीत त्यांची पर्स गाडीतच विसरली. काही वेळातच गाडी पुढील प्रवासाला निघाली. इकडे पर्स दिसत नसल्याने नेहाची तारांबळ उडाली. पर्समध्ये रोख रक्कम, एटीएम आणि महत्वाचे कागदपत्र होते. त्यांनी लगेच नागपूर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी लगेच वर्धा येथील पोलीस नायक प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून पर्सचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनी ए वन कोचमध्ये शोध घेतला असता ३५ क्रमांकाच्या बर्थवर पर्स मिळाली. वर्धा स्थानकावर उतरल्यावर प्रभारी अधिकारी दयानंद सरवदे यांना माहिती दिली. नागपूरला पर्स आणल्यानंतर सहायक उपनिरीक्षक विजय मरापे यांनी खात्री करून ती पर्स नेहा यांना परत केली. पर्स मिळाल्यामुळे नेहा अशोक यांनी लोहमार्ग पोलिसांना धन्यवाद दिले.
............