रेल्वे पोलिसांचे 'ऑपरेशन प्रवासी सुरक्षा'; गोंदियात चोरी करणाऱ्याला नागपुरात अटक

By नरेश डोंगरे | Published: March 27, 2023 02:39 PM2023-03-27T14:39:56+5:302023-03-27T14:41:53+5:30

मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा

Railway Police's 'Operation Pravasi Suraksha', a crackdown on mobile theft | रेल्वे पोलिसांचे 'ऑपरेशन प्रवासी सुरक्षा'; गोंदियात चोरी करणाऱ्याला नागपुरात अटक

रेल्वे पोलिसांचे 'ऑपरेशन प्रवासी सुरक्षा'; गोंदियात चोरी करणाऱ्याला नागपुरात अटक

googlenewsNext

नागपूर : रेल्वे पोलिसांनी चालविलेल्या ऑपरेशन प्रवासी सुरक्षे अंतर्गत धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या एका भामट्याला नागपुरातून अटक करण्यात आली. रोशन राजू लारोकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. तो सराईत चोरटा आहे.

बालाघाट जिल्ह्यातील उमरी मोहझरी (ता. लांजी) येथील संजय उके (वय ३०) हे २५ मार्चला गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करीत असताना चोरट्याने त्यांचा १३, ७०० रुपये किंमतीचा स्मार्ट फोन लंपास केला. उके यांनी या चोरीच्या गुन्ह्यांची तक्रार गोंदिया रेल्वे पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अन्य सहकाऱ्यांना या चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली.

दरम्यान, हा मोबाईल चोरणारा चोरटा कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरीच्या पार्वतीनगरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने गोंदियाचे रेल्वे पोलीस, त्यांचे गुन्हे शाखेचे पथक तसेच स्थानिक रेल्वे पोलिसांनी लगेच धावपळ सुरू करून शनिवारी रात्री ८.३० वाजता आरोपी रोशन लारोकरच्या घरी धडकले. त्यांनी रोशनला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे.

रायपूर आणि छिंदवाड्यातील आरोपीही गजाआड

अशाच प्रकारे १६ मार्चला कोचुवेली एक्सप्रेसमधून१८ हजारांचा मोबाईल चोरणारा आरोपी जगबंधू नायक (रायपूर) याला आरपीएफच्या जवानांनी अटक केली. तर, ६ मार्चला अतिश परतेती (छिंदवाडा) याने केळवद रेल्वे स्थानकावर प्रवाशाचे ३५हजार रुपये चोरले होते. ईतवारी स्थानकावर त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरपीएफच्या पथकाने त्यालाही जेरबंद केले.

Web Title: Railway Police's 'Operation Pravasi Suraksha', a crackdown on mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.