रेल्वेतील ‘एस अँड टी’ कर्मचाऱ्यांचे उपोषण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:05+5:302021-02-16T04:11:05+5:30
नागपूर : आपल्या विविध मागण्यांसाठी सिग्नल अँड टेलिकॉम विभागात कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले. ऑल इंडिया सिग्नल अँड ...
नागपूर : आपल्या विविध मागण्यांसाठी सिग्नल अँड टेलिकॉम विभागात कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले. ऑल इंडिया सिग्नल अँड टेलिकॉम स्टाफ असोसिएशनच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मध्य रेल्वे नागपूर विभागातून असोसिएशनचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव विकाससिंह सोलंकी, राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय समिती सदस्य जी. एम. शर्मा, विभागीय सचिव संजय पटेल, उपाध्यक्ष नीरज बरसकर, राजू रामटेके, सहायक विभागीय सचिव अविनाश थापे, शेखर कोरे, मनोज सिंगाडे, उमेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. रेल्वे मंत्रालयाने एस अँड टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून प्रलंबित मागण्या रेटून धरण्यात आल्या. यात एस अँड टीमध्ये कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाचे ८ तास आणि आरामाचे नियम लागू करणे, त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे रिस्क अँड हार्डशिप अलाऊन्स देणे, नाईट ड्युटी भत्त्याची मर्यादा हटविणे, सहायक व तंत्रज्ञांची थेट भरती करणे, रिक्त पदे त्वरित भरणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
........