नागपूर रेल्वेस्थानकावर दलालांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:41 AM2019-08-22T10:41:39+5:302019-08-22T10:42:06+5:30
चार महिन्यांपूर्वी आरक्षणाची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्याची माहिती आहे.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीला दोन महिने उरले आहेत. दिवाळीच्या सणाला अनेकजण रेल्वेने प्रवासाचे प्लानिंग करतात. परंतु दिवाळीच्या काळातील सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. चार महिन्यांपूर्वी आरक्षणाची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यातील तिकिटे दलालांनी बुक केल्याची माहिती आहे.
दिवाळीच्या काळातील विविध शहरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या स्थितीचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच रेल्वेगाड्यातील आरक्षण संपल्याची बाब उजेडात आली. दिवाळीच्या काळात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये २५ ते ३० आॅक्टोबर स्लिपर ५४, थर्ड एसी ३२ वेटिंग, १२८६० गीतांजली एक्स्प्रेस २८ ते ३० आॅक्टोबर थर्ड एसी ६ वेटिंग, १२८१० हावडा-मुंबई मेल २८ ते ३० आॅक्टोबर आरएसी २५, १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये २९ आॅक्टोबरला आरएसी १११ आणि १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ३० आॅक्टोबरपर्यंत १३४ वेटिंग आहे. पुण्याकडे जाणाºया गाड्यात १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस २८ ते ३० आॅक्टोबर २९१ वेटिंग, १२८४९ पुणे आझादहिंद एक्स्प्रेस २६ वेटिंग, १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस २८ ते ३० आॅक्टोबरपर्यंत ३१ वेटिंग, १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ २९ आॅक्टोबरला ३६७ वेटिंग, १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस ३१ आॅक्टोबरला २५ वेटिंग आहे. उत्तरेकडील गाड्यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस ३० आॅक्टोबरपर्यंत ८ वेटिंग, १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेस २५ आॅक्टोबरला २ वेटिंग, तर ३० आॅक्टोबर ५ वेटिंग, १२७२३ तेलंगाणा एक्स्प्रेस २५, २६, २८, २९ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. १२४०९ गोंडवाना एक्स्प्रेस २५, २६, २८ आॅक्टोबरला वेटिंग ७, १८२३७ हजरत निजामुद्दीन छत्तीसगड एक्स्प्रेस २५ आॅक्टोबरला ११ वेटिंग आहे. चेन्नईकडील गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेस १५ वेटिंग, १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेस ४ वेटिंग, १२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस २६, २८ आॅक्टोबरला ३ वेटिंग, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस ५ वेटिंग, १२६५२ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये वेटिंग १२ वर पोहोचले आहे. हावडा मार्गावरील १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये स्लिपरमध्ये बर्थ उपलब्ध असून एसी कोचमध्ये २५ वेटिंग, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस ७ वेटिंग, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये वेटिंग ३ वर पोहोचले आहे. रेल्वेगाड्यातील या स्थितीमुळे दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना अधिक पैसे मोजून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागणार आहे, हे निश्चित.
चार महिन्यापूर्वी बुकिंग बंद करावे
रेल्वेने चार महिन्यापूर्वी रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व सामान्य प्रवासी चार महिन्यापूर्वी तिकिटांचे आरक्षण करीत नाहीत. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आधीच तिकीट खरेदी करून ते प्रवाशांना अधिक दराने विकतात. त्यामुळे रेल्वेने चार महिन्यापूर्वी आरक्षण बंद करून दोन महिन्यापूर्वी आरक्षण उपलब्ध करून द्यावे.
- बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
प्रत्येकाचे ओळखपत्र तपासणार
दिवाळीच्या काळातील रेल्वेगाड्यांचे तिकीट दलालांनी काढले असले तरी रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवासात प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासण्यात येईल. यामुळे दलालांनी काढलेले तिकीट कोणते हे लक्षात येईल.
-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग