संकट काळात रेल्वेने शोधले उत्पन्नाचे नवे स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:28 AM2020-07-12T00:28:54+5:302020-07-12T00:32:12+5:30

परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पराभव न पत्करता उत्पन्न मिळविण्याचे आठ नवे पर्याय शोधून काढले आहेत.

Railways discovered new sources of income during the crisis | संकट काळात रेल्वेने शोधले उत्पन्नाचे नवे स्रोत

संकट काळात रेल्वेने शोधले उत्पन्नाचे नवे स्रोत

Next
ठळक मुद्देआठ अभिनव करार : ५ करार ठरले देशभरात नवे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पराभव न पत्करता उत्पन्न मिळविण्याचे आठ नवे पर्याय शोधून काढले आहेत. यातील पाच पर्याय भारतीय रेल्वेत पहिल्यांदा अंगीकारण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उत्पन्न मिळविण्यासाठी आठ नवे पर्याय शोधून काढण्यात आले आहेत. यात नागपूर रेल्वेस्थानकावर मास्क आणि सॅनिटायझर बॉटलच्या विक्रीसाठी लावण्यात आलेल्या ‘ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन’च्या कंत्राटातून वर्षाला १२ हजार रुपये, ‘स्पीट पाऊच व्हेंडिंग मशीन’च्या कंत्राटातून २ वर्षात २.०४ लाख रुपये, ‘ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अ‍ॅण्ड मॅनेजिंग एक्सेस' (आत्मा) सिस्टिमच्या माध्यमातून २६ लाख रुपये, पॅसेंजर लगेज आणि रॅपिड कॉन्ट्रॅक्टपासून ५.५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे पाचही कंत्राट भारतीय रेल्वेत पहिल्यांदा देण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर रेल्वेस्थानकावरील पार्सल कार्यालयात झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून १.०४ लाख रुपये, नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकावर एटीएमच्या माध्यमातून अनुक्रमे १.८० लाख आणि १.५० लाख रुपये पाच वर्षापर्यंत मिळणार आहेत.

पाच अधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधून काढण्यात पाच अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, विजय थूल आणि वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद आचार्य यांचा समावेश आहे.

Web Title: Railways discovered new sources of income during the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.