नागपुरात पाऊस, सायंकाळी थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:08+5:302021-06-04T04:07:08+5:30
नागपूर : सकाळपासून आकाशात ढगअसले तरी दिवसभर उन सावलीचा खेळ चालल्यानंतर दुपारनंतर पावसाने नागपुरात हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा ...
नागपूर : सकाळपासून आकाशात ढगअसले तरी दिवसभर उन सावलीचा खेळ चालल्यानंतर दुपारनंतर पावसाने नागपुरात हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा पसरला. सायंकाळीही तापमान बरेच खालावले होते.
नागपूर शहरात आजचे तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी आकाश ढगांनी व्यापले होते. दुपारीही अंधारून आले होते. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुमारे २० मिनिटे पाऊस आला. यामुळे वातावरण टवटवित झाले. सकाळी आर्द्रता ७७ टक्के नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ५९ टक्के होती.
हवामान विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मागील २४ तासांमध्ये विदर्भात ब्रह्मपुरी, गडचिरोली, वाशिम या ठिकाणी पाऊस झाला. बुलढाणामध्ये सर्वात कमी ३४.४ अंश सेल्सिअस तर नागपूर व गोंदीयात सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली.
...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान अकोला : ३७.८ : २५.९
अमरावती : ३७.८ : २६.०
बुलढाणा : ३४.४ : २४.२
चंद्रपूर : ३५.४ : २२.८
गडचिरोली : ३१.० : २६.०
गोंदीया : ३९.० : २७.५
नागपूर : ३९.० : २६.२
वर्धा : ३७.५ : २६.९
वाशिम : ३८.६ : २२.०
यवतमाळ : ३६.५ : अप्राप्त
...