उपराजधानीत संततधार, रिपरिप अन् गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:24 AM2019-07-31T11:24:09+5:302019-07-31T11:26:21+5:30

निसर्गाने नागपूरकरांना दुष्काळाचा चटका दिल्यानंतर आता सर्वत्र गारवा उधळला आहे. पाऊसझडीमुळे शहरातील तापमान घटून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत.

Rain in Nagpur; temperature cool down | उपराजधानीत संततधार, रिपरिप अन् गारवा

उपराजधानीत संततधार, रिपरिप अन् गारवा

Next
ठळक मुद्देतापमान घटले विदर्भासह जिल्हाभर मुसळधार बरसला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: निसर्गाने नागपूरकरांना दुष्काळाचा चटका दिल्यानंतर आता सर्वत्र गारवा उधळला आहे. पाऊसझडीमुळे शहरातील तापमान घटून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत.
शहरात मंगळवारी दिवसभर पाऊस झाला. त्यामुळे शहरातील कमाल तापमान ६ डिग्री सेल्सियसने कमी होऊन २५ डिग्री सेल्सियसवर आले. तसेच, किमान तापमान २२.६ डिग्री सेल्सियसवर पोहोचले. शहरात सकाळी ८.३० वाजतापर्यंत ५.४ मिमी पावसाची नोंद झाली. विमानतळ परिसरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ४८.४ मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळाली. पावसाची गती पाहता वस्त्यांमध्ये पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात होती.
विदर्भातील अन्य शहरांतही मुसळधार पाऊस कोसळला. चंद्रपूर येथे १३२.९, गडचिरोली येथे ११८, ब्रह्मपुरीत १००.८, यवतमाळ येथे ३७.२, अमरावतीत २३.८, वाशीम येथे २३, गोंदियात २२, वर्धा येथे १७.६ तर, अकोला येथे ४.४ मिमी पाऊस पडला. याशिवाय अन्य शहरांतही पावसाने दमदार उपस्थिती नोंदवली. येत्या २४ तासात विदर्भातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, शहरात तीन दिवस पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. या पावसामुळे अनुशेष भरून निघत आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
पूर्व मध्य प्रदेश ते छत्तीसगडदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसाने जोर पकडला आहे. तसेच, बंगालच्या खाडीतही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, विदर्भातील अनेक भागात येत्या ४८ तासानंतर पाऊस कोसळू शकतो.

Web Title: Rain in Nagpur; temperature cool down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस