३६ तासानंतर बरसल्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:01+5:302021-07-14T04:10:01+5:30
नागपूर : मागील ३६ तास उघाड दिल्यावर मंगळवारी नागपुरात पावसाच्या सरी बरसल्या. दोन दिवसात पावसाने उघाड दिल्याने निर्माण झालेला ...
नागपूर : मागील ३६ तास उघाड दिल्यावर मंगळवारी नागपुरात पावसाच्या सरी बरसल्या. दोन दिवसात पावसाने उघाड दिल्याने निर्माण झालेला उकाडा काही प्रमाणात शमला.
मंगळवारी पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली होती. या पावसाची नोंद ७.८ मिमी घेण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा शहरातील काही भागात पाऊस आला. मात्र कुठे पाऊस तर कुठे फक्त ढगाळलेले वातावरण आणि रिमझिम असे चित्र होते. सायंकाळीही ५ वाजताच्या सुमारास शहरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पहाटेच्या पावसाने वातावरण थंडावले होते. आर्द्रता ९२ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळी यात घट होऊन ती ८४ टक्के नोंदविली गेली.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील पाच दिवसाच्या जाहीर केलेल्या अंदाजात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बुधवारी दाट पावसाचा अंदाज असून त्यानंतर तीव्रता काही प्रमाणात कमी झालेली असेल. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी साधारण पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.