पोळ्याच्या उत्सवात पावसाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:12+5:302021-09-02T04:19:12+5:30
कळमेश्वर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. गतवर्षी लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात पोळा उत्साहात साजरा होऊ शकला नाही. यंदाही ...
कळमेश्वर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा. गतवर्षी लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात पोळा उत्साहात साजरा होऊ शकला नाही. यंदाही तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने कळमेश्वर शहरातील बाजारपेठेत बैलाची सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची फारशी गर्दी झालेली नाही. गत दोन दिवसांपासून पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. रविवारी हा कळमेश्वर येथील आठवडी बाजाराचा दिवस असतो. येत्या सोमवारी (दि. ६) पोळा असल्याने रविवारी, २९ ऑगस्टला बाजाराच्या दिवशी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना होती. मात्र यात पावसाने खोडा टाकला. गत तीन आठवड्यापासून पाठ फिरविणाऱ्या पावसाने दोन दिवसापासून तालुक्यात हजेरी लावली आहे. सध्या पिके उत्तम अवस्थेत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका आणि वाढलेल्या महागाईमुळे शेतकऱ्यांनी खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.