नागपुरात पाऊस थांबला, आता वाढला दमटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:31 AM2021-06-14T11:31:15+5:302021-06-14T11:31:47+5:30

Nagpur News तीन दिवसात पडलेल्या दमदार पावसानंतर नागपुरात रविवारी पावसाने उसंत घेतली. यामुळे कालच्यापेक्षा तापमानातही वाढ झाली असून वातावरणात दमटपणाही वाढला आहे. दुपारी सारेच यामुळे त्रस्त असलेले दिसले.

Rain stopped in Nagpur, now the humidity has increased | नागपुरात पाऊस थांबला, आता वाढला दमटपणा

नागपुरात पाऊस थांबला, आता वाढला दमटपणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तीन दिवसात पडलेल्या दमदार पावसानंतर नागपुरात रविवारी पावसाने उसंत घेतली. यामुळे कालच्यापेक्षा तापमानातही वाढ झाली असून वातावरणात दमटपणाही वाढला आहे. दुपारी सारेच यामुळे त्रस्त असलेले दिसले.

नागपुरात मागील तीन दिवसात ९६ मिमी पाऊस पडला होता. यामुळे वातावरण थंडावले होते. तापमानाचा पाराही एकदम २९ पर्यंत घसरला होता. मात्र रविवारी पारा ६.८ अंश सेल्सिअसने वाढून सायंकाळी ३६.२ अंश सेल्सिअस झाला आहे. सकाळी वातावरण काही प्रमाणात ढगाळलेले असले तरी पावसाचे वातावरण नव्हते. सकाळी ८ वाजताच्या नोंदीनुसार आर्द्रता ६८ टक्के होती. दिवसाही उन-सावली असे वातावरण होते. पाऊस आला नाही, यामुळे सायंकाळी आर्द्रता ५३ टक्क्यांवर आली होती.

रविवारी दिवसभर नागपूरकरांना वातावरणातील दमटपणाचा अनुभव आला. हवामान तज्ज्ञांच्या मते, नागपुरात मागील तीन दिवसात पडलेल्या पावसाने गारवा निर्माण झाला असता तरी पाऊस जमिनीमध्ये अद्याप मुरलेला नाही. यामुळे वातावरणात शितलता निर्माण होण्यासाठी काही काळ तरी वाट पहावी लागणार आहे. मृग चांगला बरसला तर लवकरच हे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, विदर्भातही रविवारी पावसाने सुटी घेतली. यामुळे चंद्रपूर आणि वाशिमचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणचे तापमान वाढलेले नोंदविण्यात आले. मागील २४ तासात नागपुरात ०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाशिम आणि गडचिरोलीमध्ये अनुक्रमे १० मिमी आणि ३४ मिमी पावसाची नोंद झाली. या सोबतच अन्य जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

 

Web Title: Rain stopped in Nagpur, now the humidity has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस