नागपुरात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:05 AM2018-04-11T00:05:39+5:302018-04-11T00:05:51+5:30
शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या २४ तासात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानंतर मात्र उकाडा वाढेल. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ४१.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४०.२ तर उर्वरित जिल्ह्यात पारा ४० डिग्रीच्या खाली राहिला. नागपूर शहरात सायंकाळी ६ नंतर अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात गारवा पसरला. रात्री ८ नंतर आकाशात पुन्हा विजेचा कडकडाट सुरू झाला. पावसाची रिपरिप सुरू होती.